Rahul Gandhi: पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी योग्य आहेत का? नितीश कुमार म्हणाले...

Rahul Gandhi PM Candidate: भारत जोडो यात्रेमुळे विरोधकांच्या राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak

Rahul Gandhi PM Candidate: भाजपविरोधात विरोधकांचा हल्लाबोल सुरुच आहे. भारत जोडो यात्रेमुळे विरोधकांच्या राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

यातच, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले की, 'पुढील सार्वत्रिक निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याचा आग्रह राज्यातील मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसने धरल्याने आपल्याला कोणतीही अडचण नाही.'

Rahul Gandhi
Rahul Gandhi म्हणाले, "लग्नासाठी मला अशी मुलगी हवीयं..."

दरम्यान, एका कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना कुमार यांनी आपण पंतप्रधान पदासाठी “स्पर्धक नाही” असा पुनरुच्चार केला. यासोबतच त्यांनी भाजपला (BJP) विरोध करणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्याच्या कटिबद्धतेला दुजोरा दिला.

तसेच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी "विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा" असतील या मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नुकत्याच केलेल्या विधानाबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना नितीश कुमार उत्तरे देत होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi T-Shirt: पुन्हा थंडी, पुन्हा हाफ टी-शर्ट... राहूल गांधींना पत्रकाराने विचारले कारण

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी सांगितले की, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. काँग्रेसच्या देशव्यापी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केल्याबद्दल कमलनाथ यांनी गांधींचे कौतुक केले.' ते पुढे म्हणाले होते की, 'आम्ही सत्तेसाठी नाही तर देशातील सामान्य लोकांसाठी राजकारण करत आहेत.'

Rahul Gandhi
Rahul Gandhi ची भगवान रामाशी तुलना, कॉंग्रेस नेत्यावर भडकले मामा सरकारमधील गृहमंत्री

ते पुढे म्हणाले की, "2024 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रश्न आहे, तर राहुल गांधी हे केवळ विरोधकांचा चेहरा नसतील, तर पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील." जगाच्या इतिहासात एवढी प्रदीर्घ पदयात्रा कोणीही केलेली नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते शेवटी म्हणाले की, ''गांधी घराण्याशिवाय इतर कोणत्याही कुटुंबाने देशासाठी इतके बलिदान दिलेले नाही. राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत, तर देशातील जनतेसाठी करतात."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com