Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: बाईक स्टंट करणं पोलिस कर्मचाऱ्याला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच...

UP Police Constable Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Manish Jadhav

UP Police Constable Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. दरम्यान, सामान्य नागरिक असो वा अधिकारी वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत.

परंतु, अनेकांना कायदे आणि नियमांचे गांभीर्य कळत नाही. अलीकडेच, उत्तर प्रदेश पोलिसमधील एका कॉन्स्टेबलचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉन्स्टेबलवर तात्काळ कारवाई करण्यात आली.

व्हिडिओमध्ये गोरखपूरमध्ये तैनात कॉन्स्टेबल संदीप कुमार चौबे वर्दीमध्ये रेसिंग बाईकवर स्टंट करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ऑडिओ डायलॉग्सही ऐकू येतो, ज्यामध्ये मुलगी (Girl) विचारते- "तुम्ही तुमच्या शत्रूंना घाबरत नाहीत का?"

त्यावर तो मुलगा उत्तर देतो- "शत्रूंना घाबरायचं काय... मृत्यूचं काय... आज नाही तर उद्या येणार... आणि जिथे भीतीचा प्रश्न आहे, तर घाबरायचं असेल तर देवाला घाबरायचं."

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) डॉ. गौरव ग्रोवर यांनी यासंदर्भात आलेल्या तक्रारींवर प्रतिक्रिया देत कारवाई केली. तपासाअंती, कॉन्स्टेबल संदीप कुमार चौबे यांनी व्हिडिओ अपलोड केला असल्याची पुष्टी झाली, जी 8 फेब्रुवारी 2023 रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी (Police) जारी केलेल्या सूचनेचे थेट उल्लंघन करते.

दुसरीकडे, या निर्देशानुसार चौबे यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यापासून रोखण्यात आले आहे.

सध्या कॉन्स्टेबल संदीप कुमार चौबे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर पोलिस कर्मचाऱ्याने फोटो-व्हिडिओ शेअर केल्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT