Viral Video: अंघोळ करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ काढणाऱ्याला चोप; भाजप नेत्याने तरुणाला चाटायला लावली थुंकी

Viral Video: झारखंडमध्ये भाजपच्या एका माजी आमदाराने अत्यंत घाणेरडे कृत्य केले आहे. या माजी आमदाराने तरूणाला थुंकी चाटायला लावली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

The BJP Leader In Jharkhand Made Young Man Lick His Spit:

झारखंडमधील जारमुंडी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी आमदार देवेंद्र कुंवर (Devendra Kunwar) यांनी एका तरुणाला गर्दीत थुंकी चाटण्यास भाग पाडले आणि नंतर लाथांनी मारहाण केली.

तौसिफ असे तरुणाचे नाव असून, नदीत आंघोळ करताना महिलांचा व्हिडिओ बनवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही घटना गेल्या रविवारी घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कारवाईस पोलिसांची टाळाटाळ

या प्रकरणी माजी आमदारावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असे सांगत पोलीस या प्रकरणी हात झटकले आहेत.

देवेंद्र कुंवर यांनी गेल्या रविवारी तरुणाला शिक्षा केल्याचे मान्य केले आहे. त्या तरुणाला शिक्षा केली नसती तर संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली असती, असे त्यांचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. तौसिफ साधू हा युवक दिह गावचा रहिवासी आहे.

Viral Video
Manmohan Singh in Rajya Sabha: राज्यसभेत व्हीलचेअरवर पोहचत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जिंकलं इंटरनेट

भाजपच्या माजी आमदारावर आरोप

माजी आमदार देवेंद्र कुंवर यांच्या म्हणण्यानुसार, गावकऱ्यांनी त्यांना नदीत आंघोळ करताना महिलांचा व्हिडिओ बनवल्यामुळे पकडले. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले आणि याप्रकरणी कारवाई करण्यास सांगितले.

दरम्यान, गर्दीत सामील असलेल्या लोकांनी त्याला थुंकण्यास आणि ते चाटण्यास सांगितले. लोक इतके संतापले होते की जर त्याला शिक्षा केली नसती तर जमावाने त्याला बेदम मारहाण केली असती. भाजप नेते देवेंद्र कुंवर यांनी त्यांला लाथ मारल्याचे मान्य केले आहे.

Viral Video
kashmiri pandit: काश्मिरी पंडित न्यायाधीशाच्या हत्येची चौकशी 30 वर्षांनंतर पुन्हा सुरू

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ पाहून लोक भाजप नेत्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

जारमुंडीचे (Jarmundi) स्टेशन प्रमुख म्हणाले की, अशा घटनेची कोणतीही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. प्रकरण समोर आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

देवेंद्र कुंवर हे 2019 मध्ये जारमंडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते, परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यापूर्वी ते याच मतदारसंघातून 1995 मध्ये JMM आणि 2000 मध्ये भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com