Maternal Brother Raped Girl with Friends Dainik Gomantak
देश

UP Crime News: अपहरण, मित्रांसह चार दिवस बलात्कार अन् निर्जन रस्ता; मामाच्या मुलाने तरुणीशी केलेल्या कृत्यांनी कानपूर हादरले

कानपूरमध्ये तरुणाने आधी मामाच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर मित्रांसह तिच्यावर चार दिवस सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला रात्री निर्जन रस्त्यावर सोडले.

Ashutosh Masgaunde

Maternal Brother Raped Girl with Friends: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये नात्याला काळीमा फासणार घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या मामाच्या मुलीचे अपहरण करत आपल्या मित्रांसह तिच्यावर चार दिवस बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

कानपूरमध्ये १२वीच्या विद्यार्थिनीचे तिच्या मामाच्या मुलाने पहिल्यांदा अपहरण केले. त्यानंतर तिला घरात नेऊन तिच्या मित्रांसह तिच्यावर ४ दिवस सामूहिक बलात्कार केला. यानंतर रात्री मुलीला निर्जन रस्त्यावर सोडले.

कानपूर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तिने तेथे मामाचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

त्याचबरोबर पोलिसांनीही या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी त्यांना 12 तासांनंतर मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली.

त्यांनी याबाबत आधीच सांगायला हवे होते. एका आरोपीला तुरुंगात टाकून पोलीस इतर दोन आरोपींना अटक करत नसल्याचा आरोपही मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

नापूरमधील गुजैनी येथील १२वीची विद्यार्थिनी १८ जुलै रोजी तिच्या शाळेच्या गेटवरुन बेपत्ता झाली होती. त्यानंतर 4 दिवसांनंतर गुजैनी पोलिसांना ही मुलगी निर्जन रस्त्यावर सापडली.

चला, तुझ्या भावाचा अपघात झाला आहे, असे सांगून माझा मामे भाऊ कल्लू याने मला शाळेच्या गेटवरून नेले, असा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.

सोनू आणि राम सालजी ही दोघेही त्याच्यासोबत होती. तिघेही तिला एका घरात घेऊन गेले. तेथे त्यांनी 4 दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडितेने सांगितले की, "यानंतर त्यांनी मला एका चौकात सोडले. जेथे पोलिसांनी मला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. मला मध्यरात्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मात्र पोलिसांनी माझ्या कुटुंबीयांना माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या कुटुंबीयांना कळवण्यात आले.

यानंतर माझे मेडिकल झाले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पण बाकीच्या आरोपींना अटक केली जात नाही.”

या संपूर्ण प्रकरणात एसीपी अभिषेक पांडे यांचे म्हणणे आहे की, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचाही शोध सुरू आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT