Sidhu Moose Wala च्या हत्येप्रकरणी अझरबैजानमध्ये कारवाई; सूत्रधाराला भारतीय अधिकारी घेणार ताब्यात

Sidhu Moose Wala: एक सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि काउंटर इंटेलिजन्स युनिटच्या दोन निरीक्षकांसह सुमारे चार अधिकारी असलेले एक पथक रविवारी रात्री अझरबैजानला पोहोचले आहे.
Sidhu Moose Wala
Sidhu Moose WalaDainik Gomantak
Published on
Updated on

Sidhu Moose Wala: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येतील प्रमुख आरोपी एक असलेल्या सचिन बिश्नोईला (Sachin Bishnoi) पकडण्यासाठी सुरक्षा एजन्सीचे अधिकारी अझरबैजानला रवाना होणार झाले असून, लवकरच त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.

कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचा भाचा सचिन हा गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या सिद्धू मूसेवालाच्या हत्येपासून फरार होता.

तो बनावट पासपोर्ट घेऊन अझरबैजानला पळून गेला होता. तेव्हापासून तो तेथेच आहे. तसेच तेथे त्याने राजकीय आश्रयासाठी अर्जही केला होता. मात्र, त्याला काही दिवसांपूर्वी अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

Sidhu Moose Wala
Jaipur Express Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलकडून बेछूट गोळीबार; एका पोलिसासह चौघांचा मृत्यू

एक सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि काउंटर इंटेलिजन्स युनिटच्या दोन निरीक्षकांसह सुमारे चार अधिकारी असलेले एक पथक रविवारी रात्री अझरबैजानला पोहोचले. बिश्नोईचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

बिश्नोईच्या प्रत्यार्पणामुळे या प्रकरणात महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची अपेक्षा आहे

Sidhu Moose Wala
Crime News: 14 वर्षांचा चिमुकला झोपेत असताना आईनेच केला घात; दोरीने गळा आवळून घेतला जीव

सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात बिश्नोईचा सहभाग हा तपासाचा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्या प्रत्यार्पणामुळे या प्रकरणात अनेक महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची अपेक्षा आहे.

मूसेवाला याची 29 मे 2022 रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर एका दिवसानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टमध्ये कबूल केले होते की, दुसऱ्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने मूसेवालाच्या हत्येचा कट आखला होता. त्यानंतर पोलिसांनी ब्रारवर या हत्येमागील सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com