Jaipur Express Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलकडून बेछूट गोळीबार; एका पोलिसासह चौघांचा मृत्यू

Jaipur Express Firing : एका धक्कादायक घटनेत, आरपीएफ कॉन्स्टेबलने सकाळी जयपूर एक्स्प्रेसमध्ये एएसआयसह चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली.
Jaipur Express Firing
Jaipur Express Firing Dainik Gomantak
Published on
Updated on

Jaipur Express Firing : जयपूरहून मुंबईला येत असलेल्या जयपूर एक्सप्रेसमध्ये सोमवारी सकाळी वापी ते सुरत दरम्यान एका आरपीएफ कॉन्स्टेबलने बेछूट गोळीबार केला. ही घटना ट्रेन क्रमांक 12956 च्या कोच B5 मध्ये सोमवारी पहाटे घडली.

यामध्ये एका रेल्वे पोलिसासह चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हल्ला केल्यानंतर कॉन्स्टेबलने धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेनंतर जयपूर एक्सप्रेस मीरा-रोड दहिसर येथे थांबवण्यात आली आहे. असे पोलिसांनी सांगितले.

गोळीबार करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. त्याने गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आरपीएफ कॉन्स्टेबल आणि त्याचा वरिष्ठ एएसआय यांच्यात काही मुद्द्यावरून बाचाबाची आणि वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर रागाच्या भरात कॉन्स्टेबल चेतनने गोळीबार केला. दहिसर परिसरात पालघर ते मुंबई दरम्यान रेल्वेवर गोळीबार झाला. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील डीआरएम नीरज वर्मा यांनी सांगितले की, सकाळी 6 च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की आरपीएफ जवानाने गोळीबार केला, ज्यामध्ये चार जण ठार झाले. आरोपी एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता.

रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.

Jaipur Express Firing
UP Crime News: अपहरण, मित्रांसह चार दिवस बलात्कार अन् निर्जन रस्ता; मामाच्या मुलाने तरुणीशी केलेल्या कृत्यांनी कानपूर हादरले

गोळीबाराचे कारण स्पष्ट नाही

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, 'आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमारने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला.

यादरम्यान अन्य तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या सर्व्हिसच्या रिव्हॉल्वरने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.'

Jaipur Express Firing
Sidhu Moose Wala च्या हत्येप्रकरणी अझरबैजानमध्ये कारवाई; सूत्रधाराला भारतीय अधिकारी घेणार ताब्यात

भरपाईची घोषणा

गोळीबारात मृत्यू झालेल्या RPF ASI टिकाराम मीणा यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे.

पश्चिम रेल्वेने सांगितले आहे की दिवंगत ASI च्या नातेवाईकांना रेल्वे सुरक्षा कल्याण निधीतून 15 लाख रुपये 15 लाख रुपये दिले जातील. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी 20 हजार रुपये आणि विमा योजनेअंतर्गत 65 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com