Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

‘नोरा फतेहीसारखी फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Uttar Pradesh Crime: पीडित महिलेने तिचा पती आणि सासरच्या लोकांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप लावला आहे. तिचा गर्भपातही गुपचूप करण्यात आल्याचे तिने सांगितले.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: ‘साहेब, माझा पती माझ्यावर खूप अत्याचार करत आहे. तो रोज मला जिममध्ये तीन तास व्यायाम करायला लावतो, जेणेकरून माझं फिगर नोरा फतेहीसारखं होईल,’ असं म्हणत एक महिला पोलीस ठाण्यात ढसाढसा रडू लागली. तिच्या अजब तक्रारीने पोलीस अधिकारीही काही काळ गोंधळून गेले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात घडली.

पीडित महिलेने तिचा पती आणि सासरच्या लोकांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप लावला आहे. तिचा गर्भपातही गुपचूप करण्यात आल्याचे तिने सांगितले.

लग्नानंतर लगेचच छळ सुरु झाला

पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार, मुरादनगर येथील एका तरुणीचे लग्न मार्च महिन्यात मेरठ येथे राहणाऱ्या एका फिजिकल एज्युकेशन टीचरसोबत झाले. लग्नात तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून 24 लाख रुपयांची महिंद्रा स्कॉर्पियो गाडी, रोकड आणि लाखोंचे दागिने दिले होते. लग्नावर एकूण 75 लाख रुपये खर्च झाले होते. एवढा खर्च करुनही सासरच्यांकडून तिचा छळ सुरु झाला.

पहिल्या रात्रीपासूनच पतीने तिच्यासोबत वाईट वागणूक सुरु केली, असे महिलेने म्हटले. ‘माझी उंची सामान्य आहे आणि मी फार सुंदर दिसत नाही’ असे सांगून तिला रोज टोमणे मारले जात होते. पती सतत तिला म्हणायचा की, ‘माझं तुझ्याशी लग्न होऊन आयुष्य खराब झालं. मला नोरा फतेहीसारखी कोणीही सुंदर मुलगी मिळाली असती.’ पतीने तिच्या शारीरिक बनावटीबद्दल सतत अपमानास्पद बोलून त्रास दिला.

व्यायामाचा सक्ती आणि गुपचूप गर्भपात

पीडित महिलेने (Women) सांगितले की, तिचा पती तिला रोज जिममध्ये जाऊन तीन-तीन तास व्यायाम करायला लावत असे. तो म्हणायचा, ‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव.’ जर कधी तिने कमी वेळ व्यायाम केला, तर तिला जेवणही दिले जात नव्हते.

एकदा पती दुसऱ्या एका मुलीसोबत चॅटिंग करत असताना महिलेने त्याला पाहिले. त्याला याबाबत विचारले असता पतीने तिला मारहाण केली. या घटनेनंतर काही दिवसांनी तिला आपण गर्भवती असल्याचे कळले. तिने ही गोष्ट सासूला सांगितली, पण सासूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिचा पती तिला रोज एक गोळी देत होता. संशय आल्याने तिने ती गोळी ऑनलाइन तपासली. तेव्हा तिला कळले की, ती गर्भपाताची गोळी आहे. त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने ती माहेरी आली. तिथे डॉक्टरांनी तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा ती आपल्या कुटुंबीयांसोबत सासरी गेली, तेव्हा तिला घरात प्रवेश दिला नाही. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली. अखेर, महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ, हेतुपुरस्सर अपमान आणि गर्भपातासाठी औषध दिल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

घाबरू नका, पुरेसा पाणीसाठा! 15 दिवस पाऊस नसला, तरी टंचाई भासणार नाही - सुभाष शिरोडकर

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

SCROLL FOR NEXT