Uttar Pradesh Crime: ‘’ती दुसऱ्या मुलाशी बोलत होती म्हणून...’’; आरोपी तरुणाने दिली गुन्ह्याची कबुली

Uttar Pradesh Bulandshahr Crime: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Uttar Pradesh Bulandshahr Crime: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा गळा चिरुन खून केला. आरोपी तरुणाने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलाशी बोलत होती, त्यामुळे त्याने तिची हत्या केली. एवढेच नाही तर खून केल्यानंतर व्हि़डिओच्या माध्यमातून आरोपीने आपल्या आरोपांची कबुली दिली. तिने माझी अडीच वर्षांची कमाई घेतल्याचे तो व्हायरल व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. बुलंदशहरमधील खुर्जा नगर कोतवाली भागातील मोहल्ला खिरखानी येथील स्मशानभूमीत मंगळवारी ही घटना घडली. या घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजताच, एखादी व्यक्ती असे क्रूर कृत्य कसे काय करु शकते, असे ते म्हणाले.

दरम्यान, बुलंदशहर येथील आरोपी तरुणाच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल अजिबात पश्चातापाचे भाव दिसत नव्हते. त्याने सांगितले की, जर त्याच्या मित्रांनीही त्याचा विश्वासघात केला तर तो त्यांनाही मारेल. तो व्हिडिओमध्ये खिदळताना दिसत आहे. तो पुढे म्हणाला की, तो बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या खलनायक चित्रपटातील बल्लू बलरामचा मोठा चाहता आहे. बलराम चित्रपटात म्हणतो की, जर प्रेमात कोणी धोका दिला तर त्याला एकच शिक्षा आहे ती म्हणजे मृत्यू.

Crime News
Uttar Pradesh Crime: लऊनऊमध्ये तरुणाचे घृणास्पद कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई; जाणून घ्या काय घडलं?

व्हिडिओमध्ये आरोपीने प्रेमात विश्वासघाताला सामोरे जावे लागल्याचे म्हटले. त्यामुळे त्याची एकमात्र शिक्षा मृत्यूशिवाय काही असू शकत नाही. म्हणून मी माझ्या गर्लफ्रेंडला मारुन टाकले. या सर्व गोष्टी आरोपीने कोणत्याही पश्चातापाशिवाय हसतमुखाने सांगितल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com