Uttar Pradesh Crime: हिंदू मुलींच्या बेकायदेशीर धर्मांतरणासाठी 1,000 हून अधिक मुस्लिम तरुणांना द्यायचा पैसे; छंगूर बाबाबाबत मोठा खुलासा!
Chhangur Baba Muslim Network Exposed: बेकायदेशीर धर्मांतर, परदेशी फंडिग आणि जमीन हडप अशा गंभीर आरोपांनी वेढलेल्या छंगूर बाबाबाबत मोठा खुलासा झाला आहे. बाबाचा सर्वात जवळचा मित्र आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचा विश्वासू असलेला मोहम्मद अहमद खानने मीडियाशी पहिल्यांदाच बोलताना छंगूर बाबाबद्दल अनेक दावे केले आहेत. अहमद खानने संपूर्ण नेटवर्क आणि टोळी कनेक्शनबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या. या नराधम बाबाने गेल्या तीन वर्षांत हिंदू मुलींच्या बेकायदेशीररित्या धर्मांतरणासाठी 1,000 हून अधिक मुस्लिम (Muslim) पुरुषांना पैसे पुरवल्याचे आता समोर आले आहे.
दरम्यान, राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छंगूर बाबाविरोधात मोठी कारवाई केली. या काळात मुस्लिम देशांकडून सुमारे 500 कोटी रुपये बाबाच्या खात्यात आल्याचा आरोप आहे. त्याने गरीब, विधवा महिलांना (Women) लक्ष्य करुन धर्मांतर रॅकेट चालवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छंगूर बाबा भारत-नेपाळ सीमेवरुन उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांमधील मुस्लिम पुरुषांना पैसे पाठवत असे. 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून हिंदू मुलींना आमिष दाखवणाऱ्या मुस्लिम पुरुषांना तो पैसे देत.
छंगूर बाबासह त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हिलाही अटक करण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांच्या एटीएस कोठडीत पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू नसरीन परदेशातून मिळणाऱ्या फंडिंगचे व्यवस्थापन करत होती. दुसरीकडे, आयबी आणि एनआयए अधिकारी परदेशी फंडिंगचा मार्ग शोधण्यासाठी आणि पुढील गोष्टींचा पर्दाफाश करण्यासाठी या दोघांची कसून चौकशी करणार आहेत. नवीन उर्फ जमालुद्दीन आणि छंगूर बाबाचा मुलगा मेहबूब याला यापूर्वीच अटक करण्यात आली. ते सध्या लखनऊ येथे तुरुंगात आहेत.
गेल्या तीन वर्षांत बाबा, नीतू, नवीन आणि मेहबूब यांच्या बँक खात्यांमधून झालेल्या मोठ्या व्यवहारांचीही एटीएस चौकशी करत आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, छंगूर बाबाने त्याच्या मुलाच्या बँक खात्याचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अजूनही युएईमधील छंगूरच्या संशयित परदेशी बँक खात्यांचा शोध घेत आहेत. शिवाय, बलरामपूरमध्ये छंगूरने बांधलेले 5 कोटींचे आलिशान घर जमीनदोस्त करण्यात आले. ते सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते. संगमरवरी सुरक्षा गेट असलेला 40 खोल्यांचा बंगला तीन दिवसांत 10 बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.