Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद अंत! मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू, तर फ्लॅटमध्ये आईचा मृतदेह पाहून चक्रावले पोलीस; नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh Crime: गाझियाबादमधील कविनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महागुणपूरम सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: गाझियाबादमधील कविनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महागुणपूरम सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या घटनेत 40 वर्षीय राजबीर सिंग यांनी 13 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली, तर त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांची 70 वर्षीय आई सतनाम कौर यांचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही मृत्यूंमागील गुंतागुंत पाहून पोलीसही चक्रावून गेले असून, ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळे रहस्य आहे, याचा तपास आता वेगाने सुरु झाला आहे.

घटनेच्या दिवशी दुपारी साधारण दीडच्या सुमारास राजबीर सिंग यांनी विनायक टावरच्या 13 व्या मजल्यावरील डक्ट एरियातून खाली उडी घेतली. खाली पडताना ते लोहेच्या शेडला धडकून जमिनीवर कोसळले. मोठा आवाज झाल्याने ड्युटीवर असलेला सुरक्षा रक्षक धावत त्या दिशेने गेला असता, त्याला राजबीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तातडीने आरडाओरडा करुन रहिवाशांना जमा करण्यात आले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजबीर यांना मणीपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणाला खरे धक्कादायक वळण तेव्हा मिळाले, जेव्हा पोलीस तपास करण्यासाठी राजबीर यांच्या तळमजल्यावरील फ्लॅट नंबर 028 मध्ये पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा उघडताच आतून तीव्र दुर्गंधी येत होती. घराची झडती घेतली असता, बेडवर राजबीर यांच्या आई सतनाम कौर यांचा मृतदेह पडलेला आढळला. प्राथमिक तपासणीनुसार, आईचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वीच झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, आईचा मृतदेह घरात असूनही राजबीर कोणालाही काही न सांगता तिथेच राहत होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आईच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्या तरी, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.

राजबीर सिंग यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती घेतली असता असे समोर आले की, त्यांचे लग्न 12 वर्षांपूर्वी झाले होते, परंतु सध्या ते बेरोजगार होते. त्यांची पत्नी किरण आणि 10 वर्षांचा मुलगा हे क्रॉसिंग रिपब्लिक भागात वेगळे राहतात. राजबीर आपल्या आईसोबत या सोसायटीत राहत होते. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राजबीर अधूनमधून बाहेर दिसत असत, परंतु त्यांच्या वृद्ध आईला कोणाही फारसे पाहिले नव्हते. कदाचित आईच्या मृत्यूमुळे निर्माण झालेले मानसिक दडपण किंवा आर्थिक चणचण यातून राजबीर यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

कविनगर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आईचा नैसर्गिक मृत्यू झाला होता की राजबीर यांनी काही टोकाचे पाऊल उचलले होते, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचे जीवन संपवले का, या सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज आणि राजबीर यांच्या मोबाईल फोनचीही तपासणी केली जात आहे, जेणेकरुन या दुहेरी मृत्यूकांडाचे गूढ उकलण्यास मदत होईल. एकाच घरातील दोन व्यक्तींच्या अशा जाण्याने महागुणपूरम सोसायटीत सध्या शोकाकुल वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT