Uttar Pradesh CM yogi meets Mauritius PM Pravind Kumar Jugnauth Dainik Gomantak
देश

योगी आदित्यनाथांनी घेतली मॉरिशसचे पंतप्रधान जुगनाथ यांची भेट

बैठकीत उत्तर प्रदेशातील गुंतवणूक आणि व्यवसायाच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सकाळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्र कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. तत्पूर्वी, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनीही हॉटेलमध्ये पोहोचून मॉरिशसच्या पंतप्रधानांशी संवाद साधला. (Uttar Pradesh CM yogi meets Mauritius PM Pravind Kumar Jugnauth)

यावेळी दोन्ही देशांचे अधिकृत प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठकीत उत्तर प्रदेशातील गुंतवणूक आणि व्यवसायाच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रविंद जगन्नाथ वाराणसी विमानतळाकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी रात्री उशिरा वाराणसीला पोहोचले होते. बाबतपूर विमानतळावरून ते थेट काशी विश्वनाथ मंदिरात गेले आणि काशीपुराधिपतीची विधिवत पूजा केली. यानंतर सर्किट हाऊसमध्ये त्यांनी वाराणसीतील विकासकामे आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमासह इतर माहितीही घेतली. पुढे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) रात्री उशिरा संदहन येथे पोहोचले.

बनारसी अंगावस्त्रमवर जरदोजी पद्धतीने मॉरिशस आणि भारताचे (India) ध्वज तयार करण्यात आले असून त्यावर दोन्ही देशांची नावे आहेत. अंगावस्त्रम हे सीएम योगी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांना सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT