कार की हेलिकॉप्टर? बिहारी व्यक्तीने केली चक्क कार मॉडिफाय

बिहारी व्यक्तीने कारला मॉडिफाय करण्यासाठी तब्बल 3.5 लाख रुपये खर्च केले आहे.
car or helicopter
car or helicopterTwitter/@ANI
Published on
Updated on

बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याच्या कारचे रूपांतर हेलिकॉप्टरमध्ये केले आहे. बिहारमधील दिवाकर कुमार या माणसाने 3.5 लाख रुपये खर्च केले आणि रोटर ब्लेड, टेल बूम आणि बरेच काही कारमध्ये लावले. तसेच कारला सुंदर रंग देखील दिले आहे.

दिवाकर कुमार यांनी सांगितले की. "मी ते यूट्यूबवर पाहिले आणि कारचे मॉडिफिकेशन करण्याचा विचार केला. कारचे (Car) मॉडिफिकेशन करण्यासाठी मी 3.5 लाख रुपये खर्च केले आहेत," एएनआयशी बोलताना दिवाकर यांनी सांगितले आहे.

car or helicopter
car or helicopterTwitter
car or helicopter
पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांची दिल्लीत महत्वाच्या मुद्द्यांवर बैठक

आता दिवाकर लग्न समारंभासाठी कार-हेलिकॉप्टर उधार देण्याची योजना आखत आहे. बिहारमधील एखाद्या व्यक्तीने त्यांच्या कारमध्ये बदल करण्याची अशी सर्जनशीलता आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेब्रुवारीमध्ये, बिहारमधील बगहा येथील रहिवाशाने 2 लाख रुपये खर्च करून त्याची नॅनो कार हेलिकॉप्टरमध्ये बदलली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com