Adani Group Row Dainik Gomantak
देश

Adani Group Row: अदानी मुद्द्यावरून संसदेत पुन्हा गदारोळ; चर्चेची मागणी फेटाळली...

विरोधकांची घोषणाबाजी; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी

Akshay Nirmale

Uproar In Parliament Session On Adani Issue: हिंडेनबर्ग रीसर्चच्या अहवालावरून अदानी समूहावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून संसदेत पुन्हा गदारोळ. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली.

वारंवार समजावून सांगूनही विरोधकांनी मागणी लावून धरली पण ती मान्य झाली नाही. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी

दरम्यान, अदानी ग्रुपमधील शेयर्स आज जोरदार तेजीत आहेत. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 10% वाढ झाली. तो 157.25 रुपयांनी वाढून 1,729.95 रुपयांवर पोहोचला. याशिवाय अदानी पोर्टही 8% वर आहे. अदानी ट्रान्समिशन आणि अदानी विल्मार प्रत्येकी 5% वर आहेत. अदानी ग्रुपमधील एसीसी आणि अंबुजा सिमेंटमध्येही सुमारे 3% वाढ झाली आहे. तथापि, अदानी पॉवर 3.5% आणि अदानी टोटल गॅस 5% खाली आहे.

विरोधी पक्षांची बैठक

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात आज समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बहुतांश विरोधी पक्षांनी आजपासून संसदीय कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आम्ही जेपीसीची मागणी सुरूच ठेवू.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, AAP आणि BRS ने संसदीय चर्चेत भाग घेण्यास नकार दिला आहे. जेपीसी स्थापन होत नाही तोपर्यंत आपण कारवाईत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांची संसदीय समिती (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. या मागणीसाठी सोमवारी काँग्रेस पक्षाने देशभरातील एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांबाहेर निदर्शनेही केली.

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले होते की, सरकारला अदानींबाबत संसदेत चर्चा नको आहे. सरकार घाबरले आहे. अदानींवर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी मोदीजी सर्वतोपरी प्रयत्न करतील. हा मुद्दा मी 2-3 वर्षांपासून मांडत आहे. अदानींमागची शक्ती पुढे आली पाहिजे.

शेअर्सच्या घसरणीनंतर गौतम अदानी यांची शुक्रवारी 22 व्या स्थानावर घसरण झाली होती. आता ते 18 व्या स्थानावर आहेत. 27 फेब्रुवारीपूर्वी अदानी हे जगातील तिसरे आणि आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT