Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये सोमवारी भयंकर भुकंपानंतर मंगळवारीदेखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या वेबसाइटनुसार मंगळवारी सकाळी 9.45 च्या सुमारास भूकंपाची नोंद करण्यात आली, रिश्टर स्केलवर त्याची 5.5 तीव्रता होती. भूकंपातील एकूण मृतांची संख्या 4300 च्या पुढे गेली आहे. तर जखमींची संख्याही 15 हजारांवर गेली आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी आलेल्या तीन मोठ्या भूकंपानंतर दोन्ही देशांतील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. 24 तास उलटूनही येथे मृतदेह मिळण्याचे प्रकार सुरूच आहेत. मोठ्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही जीवांचा शोध सुरू आहे.
सापडलेल्या लहान मुलांची, वृद्धांची, महिलांची अवस्था पाहून बचाव पथकाचे हात थरथरत आहेत. एखाद्याच्या बचावाची बातमी मिळताच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न आणि अस्वस्थता वाढते.
तुर्कस्तानच्या सॅनलिउर्फा प्रांतातही एका महिलेला 22 तासांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले. बचाव पथकाला ही महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली. दुसरीकडे, सीरियातील अलेप्पोमध्ये इमारतींचे छत कापून लोकांना बाहेर काढले जात आहे. दोन्ही देशांतील अनेक शहरांमध्ये हेच दृश्य आहे.
त्याचवेळी, सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विनाशामुळे आतापर्यंत 1444 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांनंतरही तुर्की आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात सुमारे 100 भूकंपाचे धक्के जाणवले.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे चार हजारांहून अधिक इमारती कोसळल्या आहेत. ज्यामध्ये दबून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की या भूकंपात 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू असून भारतासह जगातील अनेक देशांनी तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्वानपथकासह एनडीआरएफच्या दोन तुकड्या तुर्कीला पाठवल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय साहित्यही पाठवण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.