UP: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांत आठ मुलांचा मृत्यू  Dainik Gomantak
देश

UP: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांत आठ मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये गेल्या एका आठवड्यात 8 मुलांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये (Mathura) गेल्या एका आठवड्यात 8 मुलांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. या मुलांचा मृत्यू तापामुळे (Fever) झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रशासनाने (Administration) वेळीच कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे येथील ग्रामस्थामध्ये प्रशासनाबद्दल रोष दिसून येत आहे. उत्तर प्रदेशामधील मथुरा शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कोह (Koh) गावात गेल्या एका आठवड्यात सुमारे आठ मुलांचा (Eight children) तापामुळे मृत्यू (Death) झाला आहे. माहिती मिळताच उपजिल्हादंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना गुप्ता सोमवारी आरोग्य विभागाच्या (Department of Health) फिरत्या पथकसह गावी पोहोचल्या.

* रक्ताचे नमुने घेण्यात आले

हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने रक्ताचे नमुने घेतले. गावकऱ्यांनी उपजिल्हादंडाधिकारी संजीव वर्मा आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना गुप्ता आणि अतिरिक्त मुख्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कुमार इत्यादीना सांगितले की, गावात गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापाचा उद्रेक निर्माण झाला आहे.

* प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत

तापामुळे चार दिवसांत आठ मुलांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सीएमओ म्हणाले, गावातील प्रत्येक रुग्णांची तपासणी केली जात असून नमुने घेतले जात आहेत. याचा अहवाल आल्यानंतर परिस्थिति स्पष्ट होईल. तसेच ग्रामस्थांचा आरोप आहे की, माहिती देऊनही प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

SCROLL FOR NEXT