Fact Check: मोदी सरकारने कोणतीही वर्क फ्रॉम होम योजना आणलेली नाही

हा संदेश पूर्णरित्या निर्थक आणि खोटा असल्याचे सांगत, अशा प्रकारची कोणतीही प्रकारची योजना आणण्यात आली नसल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
Fact Check
Fact CheckDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काही दिवसांपासून WhatsApp वर घरुन काम करण्यासंबंधीचा संदेश सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मोदी सरकार एका संघटनेच्या माध्यमातून वर्क फ्रॉम करण्यासंबंधी संधी देत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून (Central Government) या संदेशावर स्पष्टीकरण आले आहे. हा संदेश पूर्णरित्या निर्थक आणि खोटा असल्याचे सांगत, अशा प्रकारची कोणतीही प्रकारची योजना आणण्यात आली नसल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

प्रेस इन्फार्मेशन ब्युरोच्या (Press Information Bureau) एका फॅक्ट चेक विभागाने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना तयार करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तुमची खोटी माहिती सांगत फसवणूक करणाऱ्या लिंकवर क्लिकही करु नका असंही त्यामध्ये सांगण्यात आले आहे. कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. त्याचबरोबर काही नागरिकांना घरामधूनच काम करण्याची संधी मिळाली आहे. जवळपास मागील एका वर्षापासून अनेक कार्यालयामधील कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या फोनवर फसवणूक करण्यासंबंधीचे खोटे संदेश पाठवले जात आहेत.

Fact Check
तालिबानवर भारताची रणनीती; मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

तर दुसरीकडे पीआयबीनेही फॅक्ट चेकमधून या मेसेजसंबंधीचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने अशा कुठल्याही योजनेची घोषणा करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सरकारच्या संबंधित असलेल्या घोषणा या कोणत्याही मंत्रालयाकडून करण्यात आली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com