Tiger  Dainik Gomantak
देश

Project Tiger: केंद्रीय अर्थमंत्रालय आणणार टायगर कॉइन

Project Tiger: 1 एप्रिल 1973 ला हा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

Project Tiger: केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने टायगर कॉईन काढण्याचा निर्णय घेतला आहे. हे टायगर कॉइन 50 रुपयांचे नाणे असणार आहे.

टायगर कॉईन काढण्याचा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे प्रोजेक्ट टायगरला अर्थात व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाले आहेत.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या राजवटीत हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. वाघांचे संवर्धन करण्यासाठी हा प्रकल्प करण्यात आला होता. 1 एप्रिल 1973 ला हा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. उत्तरखंडच्या जिम कोरबेट नॅशनल पार्क मध्ये पहिल्या व्याघ्रप्रकल्पाची सुरुवात केली होती.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी टाकलेले हे पाऊल भारता( India )च्या वन्यजीवांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरले आहे. प्रोजेक्ट टायगर ला अपेक्षित यश मिळाल्यानंतर प्रोजेक्ट इलेफंट, प्रोजेक्ट रायनोसोर असे प्रकल्प सुरुवात केली आहे.

2023 ला या प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने स्मारक नाणे काढण्याचा निर्णय घेतला आहे.

  • कसे असेल हे नाणे?

हे नाणे चार धातूंचे मिळून बनणार आहे. चार धातूंमध्ये चांदीचा वाटा 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल 5 टक्के आणि जस्त 5 टक्के असेल. दातेरी कडांची संख्या 200 इतकी असून नाण्याचे वजन 35 ग्रॅम असणार आहे.

या नाण्यावर ‘सत्यमेव जयते’ असे कोरलेले असेल. नाण्याच्या डावीकडे देवनागरी लिपीतील ‘भारत’ हा शब्द लिहलेला असेल तर उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ हा शब्द कोरला जाणार आहे. सिंह स्तंभाखाली ₹50 असे कोरले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे.

नाण्याच्या विरुद्ध बाजूच्या मध्यभागी वाघाचे चित्र असेल. चित्रासमोरील नाण्याच्या उजव्या बाजूला 1973-2023 असे कोरलेले असेल. नाण्यावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये मध्ये 50 वर्षांचे प्रोजेक्ट टायगर’ असे कोरलेले असेल असेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, सध्या देशात 53 व्याघ्र प्रकल्प असून वाघांची संख्या सुमारे 2500 आहे. याबरोबरच महाराष्ट्रात 5 व्याघ्र प्रकल्प आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT