Rahul Gandhi: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध

Rahul Gandhi: महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीDainik Gomantak

Rahul Gandhi: राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. लोसभेच्या सचिवालयाच्या या निर्णयाचा सगळीकडून विरोध होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्यानंतर आपला विरोध दर्शवला होता. आता त्यांनी तोंडाला काळया पट्ट्या निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे विरोधपक्ष आक्रमक होऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर, काल राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर या निर्णयाच्या निषेधार्थ कॉग्रेसच्या सर्वच खासदारांनी लोकसभेच्या सद्स्यात्वाचा राजीनामा दिला आहे.

महाविकास आघाडी
Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यात व्हिडिओ कोणी शूट केला? अनिक्षाप्रकरणाला नवं वळण

राहुल गांधीनी मोदी या आडनावावरुन केलेल्या एका विधानावरुन त्यांच्यावर सुरतमध्ये मानहानीचा दावा ठोकण्यात आला होता. सुरत कोर्टाने या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर लोकसचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com