PM Modi Speech: कर्नाटकात PM मोदी गरजले, विरोधकांवर जोरदार निशाणा; त्यांनी केवळ...

PM Modi Speech: ज्यांनी भारतीय भाषांना पाठिंबा देण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि त्यांच्याशी खेळ खेळला त्यांच्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली.
PM Modi
PM Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Speech: ज्यांनी भारतीय भाषांना पाठिंबा देण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि त्यांच्याशी खेळ खेळला त्यांच्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली.

ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील तरुणांना वैद्यकीय व्यवसायात येताना येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करुन मोदी म्हणाले की, हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने (Government) कन्नडसह भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

श्री मधुसूदन साई संस्थेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शनिवारी चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई गावात मोफत सेवांसाठी स्थापन केलेल्या श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे उद्घाटन केले.

यावेळी ते म्हणाले की, काही पक्षांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि व्होटबँकेसाठी भाषांबाबत खूप खेळ केला, मात्र खर्‍या अर्थाने भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक काम केले नाही. कन्नड ही समृद्ध भाषा आहे. देशाचा अभिमान वाढवणारी ही भाषा आहे.

पूर्वीच्या सरकारांनी कन्नडमध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी पावले उचलली नाहीत. मात्र, आज तुम्ही कन्नड भाषेतही शिक्षण घेऊ शकता. कन्नड भाषेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर या भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

PM Modi
PM Modi: मोठी बातमी! PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी 8 IPS अन् 1 IAS अधिकाऱ्यावर होणार कारवाई

काही राजकीय पक्षांची भूमिका पक्षपाती होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही राजकीय पक्षांना गावातील, गरीब आणि मागासवर्गीयांच्या मुला-मुलींनी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावे असे वाटत नाही. मात्र, त्यांनी पुढे येऊन आपल्या गावाचे आणि शहराचे नाव रोशन करावे.

गरिबांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या आमच्या सरकारने कन्नडसह भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय दिला आहे, जो यापूर्वी कोणत्याही सरकारने दिलेला नाही.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर आणि मधुसूदन साई आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com