Union Minister Nitin Gadkari And LG Manoj Sinha Dainik Gomantak
देश

Zojila Tunnel: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतला झोजिला टनेलचा आढावा, स्वित्झर्लंडपेक्षा...

Zojila Tunnel: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी झोजिला बोगद्याची पाहणी केली.

Manish Jadhav

Zojila Tunnel: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी झोजिला बोगद्याची पाहणी केली. 13.14 किमी लांबीचा झोजिला बोगदा हा आशियातील सर्वात लांब बोगदा, गांदरबल जिल्ह्यातील बालटाल भागात आहे, जो 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, भारतासह जगभरातील लोक स्वित्झर्लंडला जातात. मात्र, स्वित्झर्लंडपेक्षा आपले काश्मीर सुंदर आहे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये, पुढील 3-4 वर्षांमध्ये, जम्मू-काश्मीरमधील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने बनवल्या जातील. आम्ही या कामावर काम करत आहोत.

जम्मू-काश्मीरमध्ये 19 बोगदे बांधले जात आहेत

नितीन गडकरी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये 25 हजार कोटी रुपये खर्चून 19 बोगदे बांधले जात आहेत. या अंतर्गत झोजिला येथे 6,800 कोटी रुपये खर्चून 13.14 किमी लांबीचा बोगदा आणि अप्रोच रोडचे बांधकाम सुरु आहे.

त्यांनी पुढे माहिती दिली की, हा 7.57 मीटर उंच घोड्याच्या नालच्या आकाराचा सिंगल-ट्यूब, 2-लेन बोगदा आहे, जो काश्मीरमधील गंदरबल आणि लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील द्रास शहरादरम्यान हिमालयातील झोजिला खिंडीतून जाईल.

सरकारचे 5 हजार कोटी रुपये वाचले

गडकरी म्हणाले की, या प्रकल्पात स्मार्ट टनेल (SCADA) प्रणालीचा समावेश आहे, जो न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरुन तयार करण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही, रेडिओ नियंत्रण, अखंडित वीजपुरवठा आणि वायुवीजन यांसारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गडकरी पुढे म्हणाले की, भारत सरकारने 5 हजार कोटींहून अधिक रुपयांची बचत केली आहे.

झोजिला बोगदा बनवण्याचे हे फायदे होतील

झोजिला बोगद्याची लांबी 13153 मीटर आहे. आतापर्यंत त्याचे 28 टक्के काम पूर्ण झाले आहे.

आता झोजिला पास ओलांडण्यासाठी सरासरी 3 तास लागतात. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ 20 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

झोजिला जवळचा परिसर अत्यंत दुर्गम आहे. येथे दरवर्षी अनेक अपघात होतात. बोगदा पूर्ण झाल्यानंतर अपघातांची शक्यता शून्य होईल.

हा बोगदा काश्मीर खोरे आणि लडाख दरम्यान वर्षभर कनेक्टिव्हिटी प्रदान करेल ज्यामुळे लडाखच्या विकासाला, पर्यटनाला चालना मिळेल.

या बोगद्याच्या उभारणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत भारतीय सशस्त्र दलाच्या हालचालींसाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT