Union Budget 2022: Private companies will enter indian defense sector Dainik Gomanta
देश

India Budget 2022: संरक्षण क्षेत्रात होणार खासगी कंपन्यांची इंट्री

यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली

दैनिक गोमन्तक

2022-23 वर्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (India Budget 2022) आज सादर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या मनात अनेक अपेक्षा होत्या. अर्थसंकल्पादरम्यान एकाच वेळी अनेक गोष्टींबाबत नवनवीन घोषणा केल्या गेल्या आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मागील वर्षी भारत आणि चीन सीमेवर सातत्याने होणाऱ्या संघर्षाचा सामना भारत करत असल्याचे पाहायला मिळायला. या पाश्वभूमीवर यंदाच्या बजेटकडे सर्वांच लक्ष लागून राहिले होते. यांच परिस्थितीची अंदाज लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर भर दिला असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी एकूण संरक्षण बजेटमधील 68 टक्के रक्कम स्थानिक पातळीवरील उत्पादनाला दिली जाणार आहे. संशोधन आणि संरक्षण दलातील सर्व मशिनरी आणि तंत्रज्ञान देशात तयार होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन्स आणि फार्मासिटिक्लसाठी पूर्णत: आत्मनिर्भरता आणणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सांगण्यात आले. संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्याची इंट्री होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील 25 टक्के बजेट खासगी क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारताच्या संरक्षण R&Dबजेटपैकी 25 टक्के निधी खाजगी उद्योग आणि स्टार्टअपसाठी राखीव ठेवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT