prostitute Dainik gomantak
देश

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, परदेशी तरुणींसह 18 जण पकडले

पोलीस आता वेश्या व्यवसायाशी संबंधित सर्व पैलूंचा कसून तपास करत आहेत.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गुरुवारी गुन्हे शाखा आणि महिला ठाणे पोलिसांनी कारवाई करून एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी परदेशी तरुणींसह अनेक तरुणांना अटक केली आहे. हे सर्व आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आता वेश्या व्यवसायाशी संबंधित सर्व पैलूंचा कसून तपास करत आहेत.

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता, पोलिसांनी फॅमिली सलून स्पा स्किन क्लिनिकच्या नावाने सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर स्थानिक पोलिसांना झुगारून धडक कारवाई केली. काही महिन्यांपूर्वीही याच स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी अनेक परदेशी तरुणींना अटक केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत 10 मुली आणि 8 मुलांना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये काही परदेशी मुलींचाही समावेश आहे. महिला पोलिस (police) ठाण्याच्या टीआय ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या मुला-मुलींची चौकशी सुरू आहे. यापूर्वीही पोलिसांनी स्पा सेंटरवर छापे टाकले आहेत. दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशातून (Bangladesh) मुलींना येथे वेश्याव्यवसायासाठी (prostitution) आणणाऱ्या दलालाला इंदूरमधील विजयनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली होती. दोन मुली आणि 4 जणांनाही पकडले. दलालने चौकशीदरम्यान सांगितले होते की, तो बांगलादेशातून मुलींना इंदूरला आणून इतर भागात पुरवायचा. याआधीही इंदूरच्या अनेक भागातून अशा धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलीस चोख काम करत आहेत. अशा प्रकरणात पकडलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT