दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएटने धुमाकूळ घातल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर मागील काही दिवसांपासून दिल्ली, महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे निर्बंध लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याच पाश्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) देशात 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले आहे.
त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी शुक्रवारी या विषाणूचा सामना करण्यासाठी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे सांगितले. तसेच कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी दिल्ली-एनसीआर प्रदेशात एकात्मिक धोरण तयार करण्याच्या गरजेवर सुध्दा त्यांनी भर दिला. त्या पूर्वी गुरुवारी कोरोनाच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या संदर्भात दिल्ली एनसीआरमध्ये केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमधील नऊ सीमावर्ती भागातील समावेश असलेल्या जिल्ह्यांच्या संदर्भात चर्चा केली.
दुसरीकडे, कोरोना रूग्णांमध्ये ओमिक्रॉन हा नवीन प्रकारचा व्हेरीयंट असलेल्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या 3,007 झाली आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आहे. ओमिक्रॉनची सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात 876 तर दिल्लीमध्ये रूग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 3007 रुग्णांपैकी 1199 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी गुरुवारी ओमिक्रॉनची 2600 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती.
दिल्ली आणि मुंबईची अवस्था वाईट
गुरुवारी, महाराष्ट्रात 36,265 नवीन रुग्ण आढळले आणि 13 लोकांचा मृत्यू झाला. तर 8907 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी गुरुवारी मुंबईत कोरोनाचे 20,181 नवीन रुग्ण आढळले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC)दिलेल्या माहीतीनुसार महामारी सुरू झाल्यापासून एका दिवसात नोंदवले गेलेले हे सर्वाधिक रूग्ण आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत कोरोना संसर्गाचा वेग सातत्याने वाढत आहे. गुरुवारी, 15,097 नवीन प्रकरणे नोंदवली गेली तर सहा जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत पॉझिटिव रेट 15 टक्क्यांवर गेला आहे.
भारतात कोरोनाचा आकडा एक लाखाच्या वर
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,17,100 नवीन रुग्ण आढळले आहेत.देशातील एकूण संक्रमितांची संख्या 3,52,26,386 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, 302 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 4,83,178 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 30,836 लोक बरे झाले आहेत. यासह एकूण दुरूस्त झालेल्या रूग्णांची संख्या 3,43,71,845 झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव रेट (Daily positivity rate) 7.74 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. एकूण लसीकरणांची (Total vaccination) संख्या 1,49,66,81,156 आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.