Twitter account of UP government hacked Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh सरकारचे अधिकृत Twitter Account हॅक

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएम कार्यालय) अधिकृत ट्विटरनंतर आता उत्तर प्रदेश सरकारचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. यूपी सरकार @UPGovt च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर विचित्र पोस्ट केल्या जात आहेत. (Twitter account of UP government hacked)

एकापाठोपाठ एक ट्विट करून अनेकांना टॅग केले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या (Government) अधिकृत ट्विटर अकाउंटशिवाय, उत्तर प्रदेश माहिती विभागाचे फॅक्ट चेक इन्फो @InfoUPFactCheck ट्विटरअकाउंट देखील हॅक करण्यात आले आहे. यावर अनेक लोकांना @UPGovt सारखे टॅग आणि ट्विट केले जात आहे. हॅकरने अद्याप कोणताही संदेश पोस्ट केलेला नाही. तो फक्त लोकांना टॅग करणार आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे Twitter Account हॅक
शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले. सीएमओच्या (CMO) अकाउंटचा फोटो आणि बॅकग्राउंड चित्र बदलण्यासोबतच हॅकरने शेकडो लोकांना टॅग केले आणि अनेक ट्विटही केले. मिळालेल्या माहितीनुसार, सीएमओचे हे अकाउंट सकाळी 12.30 च्या सुमारास हॅक झाले. ही त्रुटी सुमारे 40 मिनिटे अशीच राहिली आणि 1.10 मिनिटांनी अकाउंट पुन्हा सुरू झाले.

रात्री उशिरा सीएमओ यूपीचे अकाउंट हॅक झाल्यानंतर सर्वप्रथम प्रोफाइलमधील चित्र बदलण्यात आले. यानंतर ब्लूबॅजर नावाच्या ट्विटर हँडलचा स्क्रीनशॉट gif फॉरमॅटमध्ये शेअर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT