'रुची सोया' आता पतंजली फुड्समध्ये सामील

2019 मध्ये पतंजली आयुर्वेदने रुची सोयाचे संपादन केल्यानंतर, कंपनीची परिस्थिती वेगाने बदलू लागली.
Ruchi Soya 'now joins Patanjali Foods
Ruchi Soya 'now joins Patanjali FoodsDainik Gomantak
Published on
Updated on

योगगुरू बाबा रामदेव यांच्या मालकीची रुची सोयाची रु. 4,300 कोटी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) बंपर हिट ठरली. एफपीओच्या सूचिबद्धतेच्या दिवशी एनएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 14.71 टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीच्या समभागात केवळ दोन सत्रांमध्ये सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची सुरुवात कशी झाली आणि कंपनी कोणत्या नावाने उत्पादने बनवते. (Ruchi Soya 'now joins Patanjali Foods)

Ruchi Soya 'now joins Patanjali Foods
इंडियन ओव्हरसीज बँकेने FD व्याजदरात केली कपात, जाणून घ्या नवीन दर

2019 मध्ये पतंजली आयुर्वेदने रुची सोयाचे (Ruchi Soya) संपादन केल्यानंतर, कंपनीची परिस्थिती वेगाने बदलू लागली. अवघ्या दोन वर्षांनी कंपनी नफ्यात आली. या अल्पावधीत कंपनीच्या उलाढालीबद्दल विचारले असता, बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "रुची सोया ही पतंजली (Patanjali) आयुर्वेदची कुलवधू आहे. जेव्हा एखादी मुलगी सुप्रसिद्ध कुटुंबाची सदस्य बनते, तेव्हा तिची ब्रँड इक्विटी आपोआप वाढते. रुची सोया सोबतही असेच घडले.

कंपनी आता कर्जमुक्त झाली आहे:

रुची सोयाचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी शुक्रवारी एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांना 2,925 कोटी रुपयांचा धनादेश दिला. यानंतर ते म्हणाले होते की रुची सोया ही पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी बनली आहे.

ही उत्पादने बनवते:

रुची सोया अनेक ब्रँड नावाने उत्पादने बनवते. यामध्ये न्यूट्रेला, महाकोश, रुची, सनरिच, रुची गोल्ड यांचा समावेश आहे. कंपनी रुची स्टार सोयाबीन ऑईल, रुची नंबर 1 व्हेजिटेबल, महाकोश रिफाइंड सोयाबीन ऑईल, रुची सनलाइट ऑइल, सनरीच रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल, रुची गोल्ड पामोलिन ऑइल तयार करते. त्याच वेळी, कंपनीचे Nutrela Soya Chunks देखील खूप लोकप्रिय आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com