...म्हणून तरुणाला हातगाडीवर झोपवून रुग्णालयात नेलं

रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी अमरजीतला मृत घोषित केले.
Hospital
Hospital Dainik Gomantak
Published on
Updated on

बिहारमधील नालंदा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हिलसा शहरातील पासवान टोला येथील अशोक पासवान यांचा 30 वर्षीय मुलगा अमरजीत कुमार याची प्रकृती खालावली. परिणामी त्याला हिलसा उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरजीत हा शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. नातेवाइकांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र रुग्णवाहिका मिळाली नाही. (He was taken to hospital on handcart)

Hospital
दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे 141 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

यानंतर अमरजीतला भाजीच्या गाडीवर झोपवून रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी अमरजीतला मृत घोषित केले. अमरजीतच्या मृत्यूनंतरही रुग्णालयात एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर डॉक्टरांनी (Doctor) मृतदेह लवकर नेण्यास सांगितले. कुटुंबीयांनी अमरजीतचा मृतदेह हातगाडीवर ठेऊन घरी नेला.

उपविभागीय रुग्णालयात आरोग्य सुविधांचा तीव्र अभाव असल्याचा आरोप होत आहे. रुग्णालयातील एकमेव रुग्णवाहिका कधीच रिकामी नसते. मृतदेह किंवा रुग्णांची ने-आण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

Hospital
फ्रान्समध्ये निवडणुका, भारतात मतदान! हे कसं झालं शक्य?

रुग्णाच्या मृत्यूनंतर सीएस काय म्हणाले?
अमरजीतच्या मृत्यूनंतर जेव्हा हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा सीएस आरके राजू म्हणाले की, हिलसा उपविभागीय रुग्णालयात आधीच रुग्णवाहिकांची कमतरता आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने रुग्णालयातील (Hospital) रुग्णवाहिका वाढविण्याची मागणी केली आहे. परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात येतात. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होतात. तसेच रुग्णालयात मृतदेह नेण्यासाठी वाहन असावे. सध्या रुग्णालयात एकच रुग्णवाहिका उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com