Eye cancer  Dainik Gomantak
देश

डोळ्यांच्या कर्करोगावर उपचार करणे होणार सोपे

रेटिनोब्लास्टोमाने ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या उपचारात आता एम्समध्ये प्लेक ब्रेकीथेरपी सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

लहान मुलांच्या डोळ्याच्या कर्करोगावर उपचार करणे आता शक्य झाले आहे. कारण दिल्लीतील एम्सच्या आरपी सेंटरमध्ये डोळ्यांच्या कर्करोगाच्या म्हणजेच रेटिनोब्लास्टोमाने ग्रस्त असलेल्या लहान मुलांवर देशाने विकसित केलेली प्लाक ब्रेकीथेरपी आता सुरू केली आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) ही रुथेनियम-106 प्लेक ब्रेकीथेरपी विकसित केली आहे. या थेरपीच्या मदतीने डोळ्यांच्या कर्करोगाचा (Eye Cancer) आजार असलेल्या लहान मुलांना रेडिएशन थेरपी दिली जाईल. आरपी सेंटरचे प्रमुख डॉ. जेएस तितियाल यांनी माहिती दिली की, एम्समध्ये या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे गरीब कुटुंबातील मुलांना मोफत उपचार दिला जाणार आहे. ते म्हणाले की, प्लाक ब्रेकीथेरपीचा उपचार हा खूप खर्चिक आहे. पण या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आता खासगी रुग्णालयातील उपचारांतील खर्च 30 टक्क्यांनी कमी होणार आहे."

आत्तापर्यंत BARC ने विकसित केलेल्या 'प्लाक ब्रॅचीथेरपी'चा वापर देशातील फक्त तीन हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे. वास्तविक, डोळ्यांच्या कर्करोगाच्या उपचारात रेडिएशनसाठी प्लाक ब्रेकीथेरपीचा वापर केला जातो. ही सुविधा सुरू करणारे एम्स हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय आहे.

* प्लाक ब्रेकीथेरपी कशी केली जाते
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी एम्सने मुलांच्या डोळ्यांच्या कर्करोगावर जर्मनीतून चार प्लाक ब्रेकीथेरपी मागवून उपचार सुरू केले होते. पण आता भारतातही लोकांना ही सुविधा मिळणार आहे. प्लेक ब्रेकीथेरपीमध्ये 2 ते 4 दिवसांसाठी तात्पुरते डोळ्याच्या वरच्या थरावर बटणाच्या आकाराचे उपकरण लावले जाते. हा प्लाक रेडिओ सक्रिय होतो, जो हळूहळू रेडिएशन उत्सर्जित करतो. या रेडिएशनमुळे रुग्णाच्या डोळ्यातील कॅन्सरची गाठ नष्ट होते. नंतर तो प्लाक काढला जातो.

* प्लाक ब्रेकीथेरपी कितपत यशस्वी आहे

या थेरीपीमुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या डोळ्याची दृष्टी वाचवण्यासाठी मदत करते. एम्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मुलांमध्ये डोळ्यांचा कर्करोग हा अनुवांशिक कारणांमुळे होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने बहुतांश मुलांना दृष्टी गमवावी लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना एम्समध्ये ही सुविधा सुरू केल्याचा फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT