Karnataka Ganpati Visarjan accident Video Dainik Gomantak
देश

Karnataka Accident: कर्नाटकात गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 9 जणांचा चिरडून मृत्यू, 20 जखमी

Karnataka Major Accident: अपघातातील मृतांमध्ये तरुणांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

कर्नाटक: गणपती विसर्जन मुरवणुकीत ट्रक घुसून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना हासन जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात २० जण गंभीर जखमी झाल्यची देखील माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास गणपती विसर्जन मुरवणूक निघाली असता ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हासन जिल्ह्यातील एका गावातून गणपती विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी भरधाव वेगाने आलेला ट्रक गर्दीत घुसला, यात नऊ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर, २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केली आहे.

शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. गणेश विसर्जनासाठी मोसळेहोसळी गावातून मिरवणूक निघाली होती. यात मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी आलेला भरधाव ट्रक मिरवणुकीत घुसला यात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तरुणांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

हसन जिल्ह्यातील या अपघाताचा भीषण व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर करण्यात आला आहे. "रस्त्याच्या एका बाजुने गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाल्याचे दिसत आहे. तर, त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या दिशेने ट्रक भरधाव वेगाने येत दुचाकीला धडक देतो. त्यानंतर ट्रक गर्दीत घुसतो," असे या व्हिडिओत दिसत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर उपचाराचा खर्च देखील सरकार करेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT