Gurugram Casino raid 43 arrested  Dainik Gomantak
देश

गोव्यात फिरायला आले, जुगार शिकले; परतल्यावर गुरूग्राममध्ये सुरू केला कॅसिनो, 43 जणांना अटक...

पोलिसांनी जप्त केली महागड्या दारूसह 2 लाखावर रोकड

Akshay Nirmale

Gurugram News: गोव्याला देशभरातून पर्यटक येत असतात. प्रत्येकाची गोव्याला येण्याची कारणे वेगवेगळी असतात. असेच तीन मित्र गोव्याला आले. हौसेने ते गोव्यातील कॅसिनोमध्ये गेले. तिथे त्यांना एक कल्पना सुचली आणि त्याच कल्पनेमुळे अखेर ते तुरूंगात पोहचल्याचे समोर आले आहे.

गोव्यात येऊन या तिन्ही मित्रांनी कॅसिनोत जाऊन जुगार कसा खेळायचा ते शिकून घेतला. त्यानंतर ते परत गुरूग्रामला परतले. तिथे जाऊन त्यांनी चक्क कॅसिनोच सुरू केला. या कॅसिनोत लोकांना मद्यासह जुगार खेळण्याचे विविध गेम्स सुरू केले.

पण, सिकिंदरपूर पोलिसांना या अवैधरित्या सुरू असलेल्या कॅसिनोची माहिती मिळाली. आणि त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या कॅसिनोवर धाड टाकली. त्यातून या कॅसिनोचा भांडाफोड झाला आहे. पोलिसांनी या अवैध कॅसिनोच्या 3 संचालकांसह 40 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

पैकी तीन संचालक म्हणजेच तेच तिन मित्र आहेत, ज्यांनी गोव्यात येऊन कॅसिनोत पाहून जुगार शिकला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी महागड्या दारूच्या 25 बाटल्या, बीअर, 2511 टोकन, जुगासाठीच्या पत्त्यांचे 12 सेट, कॅसिनो टेबल अशा साहित्यासह 2 लाख 10 हजार रूपये रोकड जप्त केली आहे.

या भागात रात्री गस्त घालत असताना सिकंदरपूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतेंद्र कुमार यांना सकतपूर येथील अरण्या ग्रीन फार्म हाऊसजवळ अवैधरित्या कॅसिनो सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

सतेंद्रकुमार यांच्या पथकाने तिथे छापा टाकला. तेव्हा तिथे जुगार आणि मद्यपान सुरू होते. पोलिसांनी तीन 3 मुख्य संशयितांसह 40 ग्राहकांना रंगेहाथ पकडले.

कृष्ण कुमार (वय 54, रा. ज्योती पार्क), सुरेंद्र कुमार (57, रा. रामनगर) आणि मनिष अशी हा कॅसिनो चालवणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, ते तिघेही जेव्हा गोव्याला फिरायला जायचे, तेव्हा तिथे त्यांनी कॅसिनो पाहिले होते. कॅसिनोत जाऊन आपल्या येथेही कॅसिनो सुरू करावा, असे त्यांना वाटले.

त्यासाठी तिघांनीही जुगार शिकून घेतला. त्याचे विविध प्रकार, गेम्स शिकून घेतले. तशा पद्धतीने त्यांनी कॅसिनो थाटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT