wine shop Dainik Gomantak
देश

विक्री दारु अन् बिअरची, मग भारतात Wine Shop का म्हणतात?

दारूच्या दुकानाला वाइन शॉप म्हणण्यामागं विशेष असं काहीसं तथ्य नाही.

दैनिक गोमन्तक

एखाद्या वस्तूचं नाव हे तिचं वैशिष्ट्य सांगत असतं, अर्थात हे सांगण्यामागं काही कारणं आहे. आपण बाजारात जातो तेव्हा दुकानावर लावलेल्या बोर्डवरील नावांवरून त्या दुकानात नेमक्या कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत, हे आपल्याला समजतं. उदाहरण द्यायचं झालं तर बोर्डावर मिठाई असं लिहिलेल्या दुकानात साहजिकच विविध प्रकारची मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असणार. (There is nothing special about calling a liquor store a wine shop)

दुकानाच्या बोर्डावर पेढे, बर्फी आदी केवळ ठराविक पदार्थांचाच उल्लेख असतो. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनं विक्री करणाऱ्या दुकानाच्या बोर्डवरती बऱ्याचदा सुपर मार्केट असं लिहिलेलं असतं. तसंच काहीसं दारू विक्रीच्या (Liquor sales) दुकानाबाबत आहे.

खरं तर कोणतंही व्यसन (Addiction) आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारकच असतं, पण तरीही मद्यपान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अल्कोहोल, वाइन (Wine) खरेदीसाठी जेव्हा कुणी दुकानात जातं, तेव्हा त्या दुकानावरील बोर्डाकडं नकळत लक्ष जातं.

सर्वसामान्यपणे दारू विक्रीच्या दुकानावर वाइन शॉप (Wine Shop) असं लिहिलेलं आढळून येतं. या दुकानात वाइन, लीकरचे विविध प्रकार मिळतात, पण तरीही त्याला वाइन शॉप असचं म्हटलं जातं. यामागे ट्रेंड हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं. या व्यतिरिक्त यामागं अजूनही काही कारणं आहेत.

देशात फ्युएल स्टेशनवरती पेट्रोल आणि डिझेल असं दोन्ही मिळतं, तरीही फ्युएल स्टेशनला पेट्रोल पंप म्हटलं जातं. पण बहुतांश लोक पेट्रोलचा वापर अधिक करतात. दारू दुकानाच्या बोर्डवरती वाइन शॉप लिहिण्यामागं असचं काहीसं कारण आहे. खरं तर वाइन शॉपमध्ये वाइनसह विविध प्रकारची दारू मिळते, पण वाइन शॉप हा असा शब्द प्रचलित झाला आहे.

दारूच्या दुकानाला वाइन शॉप म्हणण्यामागं विशेष असं काहीसं तथ्य नाही. पूर्वीच्या काळी राजे जास्त करुन वाइनचा वापर जास्त होता. त्यावेळी दारू म्हणून केवळ वाईन पिली जात होती, असे म्हटले जाते. त्यामुळे ती अधिक लोकप्रिय झाली. तसंच त्यावेळी वाइन तयार करणं खूप सोपं होतं. वाइनची निर्मिती कोणत्याही मशिनरीच्या वापराविना तयार करता येत होती. तसंच ती डिस्टिलरी दारूच्या श्रेणीतही येत नव्हती आणि बऱ्याच काळानंतर दारूचा वापर सुरू झाला.

दारू ही वाइनच्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि नंतर दुकानांमध्येही तिचा वापर सुरू झाला आणि तिच पद्धत पुढे रुढ झाली. त्यामुळे दारू विक्रीच्या दुकानाला वाइन शॉप म्हणण्यामागे केवळ ट्रेंड आणि बोलण्यात रुढ झालेला शब्द ही कारणं आहेत असं म्हणु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT