गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

goa tourist experience: गोवा हे भारताचं सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ मानलं जातं. मात्र, एका पर्यटकाने नुकताच गोव्यात फिरायला गेल्यानंतरचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
goa tourist experience
goa tourist experienceDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे भारताचं सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ मानलं जातं. मात्र, एका पर्यटकाने नुकताच गोव्यात फिरायला गेल्यानंतरचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर करत राज्यातील सध्याच्या पर्यटन व्यवस्थेवर आणि वाढलेल्या महागाईवर संताप व्यक्त केला आहे.

पर्यटकाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, "गोव्यात एक दिवस घालवला, पण हे ठिकाण आता कचराकुंडीत बदललं आहे." त्याने आपल्या पोस्टमध्ये गोव्यातील टॅक्सी व्यवस्था, भाड्याच्या वाहनांवरील मक्तेदारी, समुद्रकिनाऱ्यांची अस्वच्छता आणि अतिप्रचंड महागाई यावर टीका केली आहे.

गोवा माइल्स आणि टॅक्सीची समस्या

पर्यटकाने सांगितलं की, " 2025 मध्येसुद्धा गोव्यात तुम्हाला सहज टॅक्सी मिळत नाही. सरकारने उबर आणि ओलावर बंदी घातली आहे, त्यामुळे प्रवाशांना ‘गोवा माइल्स’ हे अॅप वापरण्याशिवाय पर्याय नाही. पण या अॅपचं UI इतकं वाईट आहे की जणू ते एखाद्या मुलाने आयपॅडवर बनवलं आहे. कधी कधी कॅब मिळवण्यासाठी ३० मिनिटांहून अधिक वेळ लागतो आणि काही ठिकाणी तर कार येण्यास मनाई आहे.”

goa tourist experience
Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

महागाईचा भडका

“गोव्यात सध्या सर्व काही प्रचंड महाग झालं आहे. रेस्टॉरंट्स, बार, आणि दुकाने सर्वत्र दर अवास्तव आहेत. दर्जा मात्र त्याच पातळीवर राहिलाय. २ पट जास्त किमतीत ५ पट कमी दर्जाची सेवा मिळते,” असंही पर्यटकाने म्हटलं आहे.

भाड्याच्या गाड्यांवरील ‘माफिया’ राज

भाड्याने स्कूटर किंवा कार घेण्यासाठी पर्यटकांना स्थानिक एजंट्सच्या मक्तेदारीचा सामना करावा लागतो. “हे पूर्णपणे माफिया सिस्टिमसारखं आहे. कोणालाही पारदर्शक दर सांगितले जात नाहीत,” असंही त्याने नमूद केलं आहे.

पर्यटकाने विशेषत: उत्तर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरची स्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. “उत्तर गोव्याचे बीच आता कचराकुंडीसारखे झाले आहेत. स्वच्छतेचा थोडाही मागमूस नाही. तसंच हॉटेल्सही अतिशय महाग असून सेवेमध्ये चांगला दर्जा राहिला नाही.

goa tourist experience
Goa Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन-पावसाचा खेळ! थंडी पडणार की मुसळधार सरी कोसळणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

‘गोवा सरकारने पार्टी कॅपिटल नष्ट केली’
शेवटी या पर्यटकाने संतापाने लिहिलं की, “गोवा सरकारने भारताची पार्टी राजधानी नष्ट करण्यात यश मिळवलं आहे. गोव्यातील वाढत्या दरांवर आणि असुविधांवर पर्यटकानं नाराजी व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com