Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

Valpoi Post Office Theft: राज्यातील सत्तरी तालुक्यात वाळपई येथे पोस्ट ऑफिसमध्ये मोठी चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे
Valpoi Theft News
Valpoi Theft NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: राज्यातील सत्तरी तालुक्यात वाळपई येथे पोस्ट ऑफिसमध्ये मोठी चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वाळपई पोस्ट ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या अभावाने तिजोरी फोडून १ लाख ९ हजार इतकी रोकड लंपास केली आहे. या चोरीमध्ये रोख रकमेव्यतिरिक्त अजून किती सामानाची चोरी झाली आहे, याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खिडकीतून प्रवेश, वेल्ड कटरने तिजोरी फोडली

चोरट्यांनी अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली आहे. चोरट्यांनी पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील्स कापून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कार्यालयातील तिजोरी वेल्ड कटरने फोडली आणि तिजोरीतील सर्व रोख रक्कम चोरून चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी पोस्ट ऑफिसचा कर्मचारी वर्ग कार्यालयात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Valpoi Theft News
Goa Crime: कोयत्याने हल्ला केला, मध्यस्थाचा घेतला चावा; मानसिक अस्वस्थतेचा दावा नाकारला, संशयितावर आरोप निश्चित

सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकाचा अभाव

या चोरीचा तपास करताना पोलिसांना मोठा अडथळा येत आहे, कारण पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मुख्य म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा रक्षकाची नेमणूक नव्हती. यामुळे चोरट्यांचा कोणताही मागमूस किंवा पुरावा उपलब्ध होऊ शकलेला नाही.

त्याचबरोबर, पोस्ट ऑफिसच्या परिसराभोवती झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, ज्यामुळे चोरट्यांना अंधाराचा फायदा घेऊन चोरी करणे अधिक सोपे झाले. सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ असतानाही शासकीय कार्यालयात एवढी मोठी रोकड ठेवल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाची तपासणी

या घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तातडीने तपास सुरू करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही महत्त्वपूर्ण नमुने गोळा केले असून, श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाळपई पोलीस या चोरीच्या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com