18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

8 lakh loot case: पर्वरी पोलिसांनी गोवा-पुणे महामार्गावर झालेल्या एका मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्याची यशस्वीरीत्या उकल केली
goa robbery case
goa robbery caseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Pune Highway Robbery: पर्वरी पोलिसांनी गोवा-पुणे महामार्गावर झालेल्या एका मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्याची यशस्वीरीत्या उकल केली आहे. या दरोड्यात ८ लाख रोख रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथून एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. या अटकेमुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील गुन्हेगारीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.

पोलीस बनून लूटमार; 'सुझुकी बर्गमॅन' जप्त

पर्वरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. काही अज्ञात व्यक्तींनी पोलिसांची खोटी ओळख सांगून महामार्गावर एका वाहनाला थांबवले आणि त्या वाहनातील प्रवाशांकडून रोख रक्कम लुटली.

या गुन्ह्यानंतर लगेचच पर्वरी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, पर्वरी पोलीस पथकांनी पुणे, कल्याण आणि ठाणे या शहरांमध्ये समन्वय साधून अनेक ठिकाणी छापे टाकले.या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमॅन स्कूटर जप्त केली. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस पथकाने पुणे आणि ठाण्यातील इराणी वस्तीच्या भागात तळ ठोकला होता.

goa robbery case
Goa Crime: कोयत्याने हल्ला केला, मध्यस्थाचा घेतला चावा; मानसिक अस्वस्थतेचा दावा नाकारला, संशयितावर आरोप निश्चित

पुणे क्राइम ब्रांचच्या मदतीने आरोपी जेरबंद

पर्वरी पोलिसांनी पुणे क्राइम ब्रांचच्या सहकार्याने या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केली. मुख्तार सय्यद इराणी (वय ३४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी 'सराईत गुन्हेगार' असून, त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये १८ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर आरोपीला गोव्यात आणण्यात आले असून, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उप-अधीक्षक विश्वेश कारपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी लुटलेली रक्कम आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com