रोमानियाहून 229 भारतीय मायदेशात दाखल!

रोमानियातील सुसेवा येथून 229 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष इंडिगो विमान शनिवारी दिल्लीत दाखल झाले आहे.
229 Indian nationals reach Delhi from Romania
229 Indian nationals reach Delhi from RomaniaDainik Gomantak
Published on
Updated on

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाचं, रोमानियातील सुसेवा येथून 229 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष इंडिगो विमान शनिवारी (5 मार्च) दिल्लीत दाखल झाले आहे. (229 Indian nationals reach Delhi from Romania)

229 Indian nationals reach Delhi from Romania
पाकिस्तानच्या भवितव्याचा आज होणार फैसला

रोमानिया, पोलंड, स्लोव्हाकिया आणि हंगेरीसह युक्रेनच्या सीमेवर असलेल्या देशांमधून भारत आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, किरेन रिजिजू, ज्योतिरादित्य सिंधिया आणि जनरल व्हीके सिंग सध्या युक्रेनला लागून असलेल्या देशांमध्ये 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत सुरू असलेल्या निर्वासनांवर देखरेख करण्यासाठी आहेत.

शुक्रवारी, रोमानियातील (Romania) भारतीय दूतावासाने युक्रेन सोडलेल्या आणि बुखारेस्टमध्ये (Bucharest) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हॉटलाइन नंबर सूचित केला, जे भारतात (India) स्थलांतरित होण्याची वाट पाहत आहेत. ट्विटरवर घेऊन, दूतावासाने लिहिले आहे की, "जे भारतीय विद्यार्थी अजूनही बुखारेस्टमध्ये आहेत त्यांनी कृपया पुढील दोन दिवसांत सुटणाऱ्या फ्लाइटद्वारे बाहेर काढण्यासाठी हॉटलाइन क्रमांक +40 725964976 वरती दूतावासाशी संपर्क साधावा."

229 Indian nationals reach Delhi from Romania
Russia Ukraine War: रशियामध्ये फेसबुकसह मीडिया वेबसाइट्स झाल्या डाऊन

शनिवारी 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 2,000 हून अधिक भारतीय नागरिकांना बाहेर काढले जाण्याची अपेक्षा आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले. "उद्या, 11 विशेष नागरी उड्डाणे 2,200 हून अधिक भारतीयांना परत आणण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 10 नवी दिल्लीत तर 1 मुंबईत लँड होणार आहे असे विधान IANS ने म्हटले आहे.

"बुडापेस्ट येथून पाच उड्डाणे, 2 रझेझोव तर 4 सुसेवा येथून निघणार आहेत. 4 सी-17 विमाने रोमानिया, पोलंड आणि स्लोव्हाकियासाठी हवाई आहेत, जी उद्या रात्री उशिरा आणि पहाटे पोहोचण्याची अपेक्षा दर्शवली जात आहे," असे मंत्रालयाने म्हटले आहे.

229 Indian nationals reach Delhi from Romania
पाकिस्तानमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट, 30 जणांचा मृत्यू तर 50 हून अधिक जखमी

शुक्रवारी, युक्रेनच्या (Ukraine) शेजारील देशांमधून 17 विशेष उड्डाणे भारतात दाखल झाली आहेत, ज्यात 14 नागरी उड्डाणे आणि तीन C-17 IAF उड्डाणे समाविष्ट आहेत. एमईए व्ही. मुरलीधरन यांनी एका ट्विटमध्ये सांगितले आहे की, युक्रेनमधून आतापर्यंत सुमारे 11,000 भारतीयांना मायदेशात पाठविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com