पामतेल अन् शेंगदाणा तेलाची स्पर्धा! भाव भिडले गगनाला

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे अनेक गोष्टींवरती परिणाम झाला आहे. याचे परिणाम आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत येऊन पोहोचल्याचं चित्र दिसत आहे.
Peanut oil prices have risen
Peanut oil prices have risenDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया (Russia) आणि युक्रेनच्या (Ukraine) युद्धामुळे अनेक गोष्टींवरती परिणाम झाला आहे. याचे परिणाम आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत येऊन पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. भारत (India) खाद्यतेल युक्रेनमधून आयात करतो तर आता ही आयातच बंद असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यामुळे एकेकाळी 20 ते 25 रुपये किलोने मिळणारं पामतेल आता चक्क शेंगदाणा तेलाच्या किमतीत मिळायला लागलं आहे. तर इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचं जाणकार सांगत आहेत. (Peanut oil prices have risen)

Peanut oil prices have risen
राणे पिता-पुत्र यांना अटकेपासून दिलासा

ही उलथापालथ युक्रेन आणि रशिया युद्धाच्या सामान्यतः दहाव्याच दिवशी बघायला मिळत आहे. हे युद्ध अजून थांबण्याची कुठलीही चिन्हं दिसत नसल्याने आगामी काळात सरकारने यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. काही भागात या परिस्थितीचा फायदा व्यापारी साठवणूक करुन घेत असल्याचंही चित्र आहे. पण सामान्यतः हलक्या प्रतीचं तेल म्हणून आपण पाम, सरकी, सोयाबीन या तेलाकडे बघतो तर उच्च प्रतीचे तेल म्हणून शेंगदाणा, करडी तेल यांच्याकडे ही पाहतो. म्हणूनचं उच्च प्रतीच्या तेलाचे भाव नेहमीच जास्त राहिलेले आहेत. मागील 40 ते 50 वर्षात आजच्यासारखं कधीच घडलं नव्हतं.

कारण आधीच्या काळात सामान्य नागरिक उच्च प्रतीच्या तेलाला प्राधान्य देत असल्याने शेंगदाणा तेलाला मागणी जास्त असल्याने कायम भाव तेजीत असायचे. पण आजच्या परिस्थितीत पामतेलाची टंचाई उद्भवल्याने आता पामतेलाची किंमत ही शेंगदाणा तेला इतकीच झाली. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक झाले आहे. बुलढाण्यातील खामगाव ही मोठी बाजारपेठ आहे आणि खामगावात अनेक तेल निर्मिती करणारे कारखाने आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाढणाऱ्या तेलाच्या भावाचीच चर्चा बाजारपेठेत रंगताना दिसत आहे.

Peanut oil prices have risen
OBC आरक्षणावरुन फडणवीस अन् भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक

24 फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरु झालं. परिणामी युक्रेन आणि राशियातून आयात होणारं खाद्यतेलही बंद झालं. त्याचवेळी शेंगदाणा तेलाचीही निर्यात बंद झाली, त्यामुळे शेंगदाणा तेलाचे भाव थोडे कमी होऊन पामतेलाचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे शेंगदाणा आणि पामतेल जवळपास सारख्याच भावात मिळू लागलं आहे. पण ही झालेली भाववाढ सामान्यांच्या बजेटला कात्रीच लावणारे आहे. कारणे अनेक आहेत पण यावर नियंत्रण मिळवून सरकारने सामान्यांना दिलासा देण्याची मागणी होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com