Ram Setu Dainik Gomantak
देश

Ram Setu: रामसेतूचे ठोस पुरावे नाहीत; सरकारची संसदेत माहिती...

सॅटेलाईट इमेजसमध्ये दिसणारी चुनखडीची श्रृंखला पुलाचे अवशेष असल्याचा दावा नाही

Akshay Nirmale

Ramsetu: भारत आणि श्रीलंका यांच्यातील रामसेतूचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे. भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी गुरुवारी राम सेतूवर विचारलेल्या प्रश्नाला अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देत होते. ते म्हणाले, ज्या ठिकाणी पौराणिक रामसेतू असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रह छायाचित्रे घेण्यात आली आहेत. पाण्यात बेट आणि चुनखडी दिसतात, परंतु हे रामसेतूचे अवशेष असल्याचा दावा करू शकत नाही.

जितेंद्र सिंह राज्यसभेत म्हणाले, 'तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही प्रमाणात आम्ही पुलाचे तुकडे, बेट आणि चुनखडीचा ढिगारा ओळखण्यात यशस्वी झालो आहोत. तो पुलाचा भाग आहे की त्याचे अवशेष हे आपण सांगू शकत नाही. अंतराळ विभाग या कामात गुंतला आहे. रामसेतूच्या शोधात काही मर्यादा आहेत. कारण त्याचा इतिहास 18 हजार वर्षे जुना आहे आणि जर आपण इतिहासात गेलो तर हा पूल सुमारे 56 किलोमीटर लांब होता.

भारताच्या रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या ईशान्येकडील मन्नार बेट यांच्यामध्ये उथळ चुनखडीच्या खडकांची साखळी आहे. रामसेतू जगभरात अॅडम्स ब्रिज म्हणून ओळखला जातो. या पुलाची लांबी सुमारे 30 मैल (48 किमी) आहे. हा पूल मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी एकमेकांपासून वेगळे करतो. या भागात समुद्र खूप उथळ आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या बोटी व जहाजे चालविण्यात अडचणी येत आहेत.

असे म्हटले जाते की 15 व्या शतकापर्यंत या वास्तूवरून रामेश्वरम ते मन्नार बेटापर्यंत चालत जाऊ शकत होते, परंतु वादळांमुळे येथील समुद्र खोल गेला, त्यानंतर हा पूल समुद्रात बुडाला. 1993 मध्ये, नासाने या रामसेतूची उपग्रह छायाचित्रे प्रसिद्ध केली, ज्यामध्ये त्याचे वर्णन मानवनिर्मित पूल म्हणून केले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT