Corona Vaccine: आता नाकाद्वारे लस! लसीला केंद्राची मंजुरी, देशभरात मॉक ड्रिल सुरू

केंद्र सरकारने नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे.
Nasal Vaccine
Nasal Vaccine Dainik Gomantak
Published on
Updated on

काही देशांमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालय नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. केंद्र सरकारने नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे. याबाबत देशभरात मॉक ड्रिल देखील सुरू झाले आहे. कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. सणासुदीच्या काळात, कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Nasal Vaccine
Vagator: वागातोर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन गाळे जळून खाक; अडीच लाखाचे नुकसान

कोरोना प्रतिबंधक लस Covishield आणि Covaxin ज्यांनी घेतली आहे ते देखील हेटरोलॉजस लस बूस्टर म्हणून घेऊ शकतात. आजपासून लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात आला आहे. काही काळासाठी, ही लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गेल्या 8 महिन्यांत भारतातील रूग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या कमालीची कमी झाली आहे.

Nasal Vaccine
Kopardem: धक्कादायक! कोपार्डे येथे शिकारी जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "एक नवा कोरोना व्हेरिएंट आला आहे, जो चीन, कोरिया, ब्राझीलमधून पसरण्यास सुरुवात झाली आहे. आता तो दक्षिण आशियामध्ये येत आहे. 20-35 दिवसांत तो भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल."

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जगातील काही भागांमध्ये वाढत्या कोविड रूग्णसंख्येवरून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com