The work of a housewife cannot be measured in money. Dainik Gomantak
देश

गृहिणींच्या कामाला पैशात मोजता येणार नाही: हायकोर्ट

याचिकाकर्ता आपल्या पत्नीचे उत्पन्न न्यायालयासमोर सिद्ध करू शकला नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

Ashutosh Masgaunde

The work of a housewife cannot be measured in money. A woman takes care of the entire family and therefore definitely deserves compensation.

मोटार वाहन अपघातप्रकरणी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने (Himachal Pradesh High Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

न्यायमूर्ती वीरेंद्र सिंह म्हणाले की, गृहिणीचे काम पैशात मोजता येत नाही. एक स्त्री संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते आणि त्यामुळे ती नक्कीच नुकसानभरपाईची पात्र आहे.

मोटार वाहन अपघात प्राधिकरण उना यांच्या निर्णयात सुधारणा करून न्यायालयाने, महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली आहे.

याचिकाकर्ते असलेले मृत महिलेचे पती दिलबाग सिंग यांना ३,२१,५०० रुपये भरपाई देण्याचा आदेश देताना न्यायालयाने ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला.

यापूर्वी प्राधिकरणाने याचिकाकर्त्याला केवळ 15,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामध्ये उच्च न्यायालयाने सुधारणा केली.

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात बदल करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयासमोर असा युक्तिवाद करण्यात आला की, १६ जून २००७ रोजी त्यांची पत्नी माँ वैष्णोचे दर्शन घेऊन घरी येत होती. ती ज्या गाडीने येत होती त्या गाडीचा चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला.

याचिकाकर्त्याने मोटार वाहन अपघात प्राधिकरण, उना यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी याचिका दाखल केली. प्राधिकरणाने याचिकाकर्त्याची याचिका अंशतः स्वीकारली आणि 15,000 रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्ता आपल्या पत्नीचे उत्पन्न न्यायालयासमोर सिद्ध करू शकला नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

उच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित नोंदींचा अभ्यास केल्यानंतर सांगितले की, महिलेच्या कामाला पैशाने तोलता येत नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, जर गृहिणीच्या नुकसान भरपाईचे मूल्यांकन करायचे असेल तर त्या प्रकरणात महिलेने घरात केलेले काम पाहिले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT