Map Of Greater Nepal Dainik Gomantak
देश

Greater Nepal Map: काठमांडूच्या महापौरांचा यूपी-बिहारवर दावा! ग्रेटर नेपाळच्या नकाशामुळे वातावरण तापले

New Parliament Building : नवीन संसद भवनात 'अखंड भारत'चा नकाशा पाहून शेजारी राष्ट्र नेपाळ संतापला आहे. त्यामुळे काठमांडूच्या महापौरांनी आता आपल्या कार्यलयात ग्रेटर नेपाळचा नकाशा लावला आहे.

Ashutosh Masgaunde

 Greater Nepal Map In Mayor Office: नवीन संसद भवनात लावण्यात आलेल्या 'अखंड भारत'च्या नकाशाला उत्तर म्हणून नेपाळने आता खेळी केली आहे.

नेपाळमधील काठमांडू शहराचे महापौर बालेंद्र शाह यांच्या कार्यालयात ग्रेटर नेपाळचा नकाशा ठेवण्यात आला आहे.

नेपाळच्या रातोपती न्यूज वेबसाइटनुसार, महापौर बालेंद्र शाह यांचे स्वीय सचिव भूपदेश शाह यांनी सांगितले की, ग्रेटर नेपाळचा नकाशा नॅशनल असेंब्ली हाऊसमधील महापौर शाह यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा सध्या बंगळुरूमध्ये आहेत. पत्नीवर उपचार करण्यासाठी ते बंगळुरूला आले आहेत. त्याचवेळी त्यांचे स्वीय सचिव भूपदेश शाह म्हणाले की, महापौर बालेंद्र शाह यांच्या सूचनेनुसार सचिवालयाने ग्रेटर नेपाळचा नकाशा ठेवला आहे.

 नव्या संसदेत अखंड भारताचा नकाशा

वास्तविक, भारताने आपल्या नवीन संसदेत अखंड भारताचा नकाशा ठेवला आहे. नेपाळमधील लुंबिनी आणि कपिलवस्तुचाही नकाशात समावेश करण्यात आला असून, याला नेपाळमधील विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला आहे.

नेपाळमधील लोक भारताच्या कारवाईला विरोध करत आहेत, तर महापौर बालेंद्र शाह यांच्या कार्यालयात ग्रेटर नेपाळचा नकाशा ठेवण्यात आला आहे.

सुगौली कराराच्या आधी नेपाळी प्रदेशाचा समावेश ग्रेटर नेपाळच्या नकाशात करण्यात आला होता. बालेंद्र शाह यांनी, नेपाळचा इतिहास कोणीही पुसून टाकू शकत नाही, असे सांगत नकाशा लावण्याची सूचना केली. यापूर्वी नेपाळमधील विरोधी पक्षांनीही अखंड भारताच्या नकाशावर नाराजी व्यक्त केली होती.

नेपाळच्या नकाशात यूपी आणि बिहारचा समावेश

नेपाळच्या सीपीएन-यूएमएलसह नेपाळी विरोधी पक्षांनी सरकारकडे अखंड भारत नकाशाचा मुद्दा उचलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काठमांडूच्या महापौर शाह यांच्या कार्यालयात ग्रेटर नेपाळच्या नकाशात पूर्व तिस्ता ते पश्चिम कांगडा, सध्याचा भारतीय भूभाग समाविष्ट करण्यात आला आहे.

या नकाशात बिहार आणि उत्तर प्रदेशचा भागही दाखवण्यात आला आहे. नेपाळी काँग्रेसचे सरचिटणीस गगन थापा यांनीही गुरुवारी (8 जून) सांगितले की, देशाला अखंड नेपाळचा नकाशा अधिकृतपणे प्रकाशित करण्याचा अधिकार आहे.

यापूर्वी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनी अखंड भारत नकाशाप्रकरणी भारताला इशारा दिला होता. भारत आणि नेपाळमध्ये सध्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा यावरून सीमावाद सुरू आहे.

हे सर्व क्षेत्र सध्या भारताच्या ताब्यात असून नेपाळने त्यावर दावा केला आहे. 2020 मध्ये चीनच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या केपी ओलीने या भागांना नेपाळचा भाग म्हणून वर्णन करणारा नवा नकाशा प्रसिद्ध केला. यानंतर दोन्ही देशांचे संबंध  बिघडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT