Taiwan-China conflict: चीनच्या 37 लढाऊ विमानांचा तैवानमध्ये धुमाकूळ

Chinies Fighter Jets: संरक्षण मंत्र्यांचे प्रवक्ते सन ली फांग यांनी गुरुवारी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुमारे 37 लष्करी विमाने तैवानच्या नैऋत्य सीमेत घुसली होती.
Taiwan-China Conflict
Taiwan-China ConflictDainik Gomantak
Published on
Updated on

चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान, गुरुवारी तौवानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, 6 तासांच्या आत चीनच्या 30 हून अधिक लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश केला.

चिनी लष्कराच्या एक दिवसीय घुसखोरीत झपाट्याने वाढ झाली आहे. चीनचा दावा आहे की स्वशासित तैवान हा त्यांचा प्रदेश आहे आणि गरज पडल्यास ते एका दिवसात ताब्यात घेतील.

अलिकडच्या वर्षांत, चीनने तैवानचे हवाई संरक्षण म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्रात घुसखोरी वाढवली आहे, जी पूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत   दुप्पट झाली आहे.

घुसखोरी कधी झाली

तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्र्यांचे प्रवक्ते सन ली फांग यांनी गुरुवारी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुमारे 37 लष्करी विमाने तैवानच्या नैऋत्य सीमेत घुसली होती. त्याच वेळी, त्यांनी 11 वाजता सांगितले की त्यांच्यापैकी काही लांब पल्ल्याची विमाने पश्चिम पॅसिफिकच्या दिशेने निघाले.

मात्र, यंदाची ही मोठी घुसखोरी नाही. याआधी 9 एप्रिल रोजी सुमारे 45 उढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. मात्र गुरुवारची घुसखोरी फार कमी वेळात झाली. एका ट्विटमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की, तैवानचे सैन्य त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. प्रत्युत्तर म्हणून, गस्ती विमाने, नौदलाची जहाजे आणि जमिनीवर आधारित क्षेपणास्त्र यंत्रणा पाठवण्यात आली आहे.

Taiwan-China Conflict
S Jaishankar On Canada: 'उलटा चोर कोतवाल को डांटे..."! एस जयशंकर यांनी काढले कॅनडा सरकारचे वाभाडे

तैवानची सीमा चीनला लागून

 तैवानचा एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन त्याच्या हवाई क्षेत्रापेक्षा खूप मोठा आहे आणि काही ठिकाणी तो चीनच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनलाही ओव्हरलॅप करतो. एवढेच नाही तर हवाई क्षेत्रच नाही तर कुठेतरी त्यात मुख्य भूभागाचाही समावेश होतो. विश्लेषकांचे म्हणणे आहे की तैवानच्या संरक्षण क्षेत्रातील चीनची वाढती घुसखोरी हा तैवानवर दबाव ठेवण्यासाठी त्याच्या व्यापक ग्रे झोन धोरणाचा एक भाग आहे.

Taiwan-China Conflict
Italian Lawmaker Breastfeeding: गिल्डा स्पोर्टिएलो इटलीच्या संसदेत स्तनपान करणाऱ्या पहिल्या माता! पाहा व्हिडिओ

चीनने तैवानला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार    

अमेरिका, फिलिपिन्स आणि जपानने दक्षिण चीन समुद्रात त्यांचा संयुक्त तटरक्षक सराव पूर्ण झाल्याची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी ही घुसखोरी झाली. इतर देशांसोबत तैवानच्या राजनैतिक सहभागासह तैवानभोवती चिनी सैन्याच्या लढाऊ विमाने आणि नौदल सरावांमध्ये झालेली वाढ अनेक गोष्टी स्पष्ट करते.

चीनने नेहमीच तैवानला सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या राजनैतिक कृतींचा निषेध केला आहे आणि बेटाच्या आजूबाजूला होणाऱ्या कोणत्याही संयुक्त सरावावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com