BSF Shoots Pak Drone: बीएसएफची मोठी कारवाई; पाकिस्तानातून आलेले 37 कोटींचे हेरॉईन जप्त

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी पंजाब सीमेवर पाकिस्तानी तस्करांचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी केला आहे
BSF Shoots Pak Drone
BSF Shoots Pak DroneDainik Gomantak
Published on
Updated on

BSF Shoots Pak Drone: सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी पंजाब सीमेवर पाकिस्तानी तस्करांचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी केला आहे.

रात्री ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सतर्क जवानांनी गोळीबार करून ड्रोन केवळ परत पाठवले नाही, तर त्यातून फेकलेले 37 कोटी रुपयांचे हेरॉईनही जप्त केले.

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने पुन्हा एकदा मध्यरात्री अमृतसर सीमेवर घुसखोरी केली आहे. पण सतर्क जवानांनी ड्रोनचा आवाज ओळखून गोळीबार सुरू केला. दरम्यान, ड्रोनने मोठे पॅकेट टाकल्याचा आवाज आला. ड्रोन परत गेला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

BSF Shoots Pak Drone
Earthquake In Ladakh: लडाख पुन्हा हादरले, रिश्टल स्केलवर 3.2 तीव्रता

रात्रीच्या सुमारास परिसर सील करून शोधमोहीम राबविण्यात आली आहे. अमृतसरच्या सीमेवरील राय गावच्या शेतात बीएसएफ जवानांना पिवळ्या रंगाचे एक मोठे पॅकेट सापडले आहे.

  • हुक आणि पिवळ्या टेपने सील करण्यात आले

राई गावच्या शेतात सापडलेले पाकीट पिवळ्या टेपने झाकलेले होते. त्याला एक हुक देखील जोडलेला होता. ज्याद्वारे तो ड्रोनमधून फेकला जात होता. बीएसएफ जवानांनी पॅकेट उघडले असता त्यात 5 छोटी पाकिटे आढळून आली. वजन केले असता एकूण वजन 5.25 किलो निघाले. ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे 37 कोटी आहे.

पाकिस्तानी तस्करांकडून ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सतत सुरुच आहे. नुकतेच अमृतसर सीमेवर ड्रोन पाडण्यात आले होते. तरनतारनमध्ये 2.5 किलो हेरॉईनची खेप जप्त करण्यात आली आहे. त्याचवेळी माल नेण्यासाठी आलेल्या एका भारतीय तस्कराची मोटारसायकल जप्त करण्यात बीएसएफ जवानांना यश आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com