Kedarnath Yatra Dainik Gomantak
देश

मुसळधार पाऊस अन् ऑरेंज अलर्टमुळे केदारनाथ यात्रेला ब्रेक!

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने केदारनाथ यात्रा (Kedarnath Yatra) तात्पुरती थांबवावी लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Kedarnath Yatra: हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवावी लागली आहे. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भाविकांना मंदिरात न जाण्याचा आणि हॉटेलमध्ये परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रुद्रप्रयागचे सर्कल ऑफिसर प्रमोद कुमार म्हणाले, "सोमवारी सकाळपासून ऑरेंज अलर्ट आणि पावसामुळे आम्ही पादचाऱ्यांना थांबवून हॉटेलमध्ये परत जाण्याची विनंती केली आहे. भाविकांना सध्या मंदिरात न जाण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षित रहा."

विशेष म्हणजे, गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे उघडल्यानंतर या महिन्यात चारधाम यात्रा सुरु झाली आहे. केदारनाथचे (Kedarnath) दरवाजे 6 मे रोजी तर बद्रीनाथचे दरवाजे 8 मे रोजी उघडण्यात आले होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी, उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी एप्रिलच्या शेवटी मंदिर परिसरात पोहोचले आणि त्यांनी चालू असलेल्या बांधकाम कामांचा आणि आगामी प्रवासाशी संबंधित तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाममध्ये पूर्ण झालेल्या सरस्वती आस्था पथाची पाहणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT