नोएडाच्या भक्ताने कुत्र्याला घेऊन गाठले केदारनाथ, मंदिर समितीने दाखल केली FIR

कोणी आपल्या कुटुंबासह तर कोणी मित्रांसोबत केदारनाथला जात आहे
Kedarnath
Kedarnath Twitter

केदारनाथ यात्रा सुरू झाली आहे. अनेक भाविक भक्त केदारनाथला निघाले आहे. अशातच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केदारनाथमध्ये एक भक्त श्वानासोबत भगवान नंदीची पूजा करत होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता याप्रकरणी पोलिसांनी विशेष लक्ष देत कारवाई केली आहे. (Kedarnath Yatra)

केदारनाथचे दरवाजे उघडल्यापासून बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचत आहेत. कोणी आपल्या कुटुंबासह तर कोणी मित्रांसोबत जात आहेत. पण एक व्यक्ती आपल्या साथीदारासह बाबा केदारनाथच्या दारात पोहोचली, ज्यामुळे तो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला. खरंतर नोएडाचा रोहन त्यागी आपल्या पाळीव श्वानाला घेऊन केदारनाथला गेला होता. त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Kedarnath
केदारनाथ होणार प्लास्टिक 'फ्री झोन' !

काय म्हणाले पोलीस अधीक्षक?

रुद्रप्रयागचे पोलिस अधीक्षक आयुष अग्रवाल यांनी व्हायरल व्हिडिओवर कारवाई करणार अशी माहिती दिली. ते म्हणाले, "मंदिराच्या आवारात एका व्यक्तीने श्वान आनला होता. आणि केदारनाथ मंदिरातील भगवान नंदीच्या मूर्तीला श्वानाने स्पर्श केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलीस अधीक तपास करत आहेत."

समितीने केले ट्विट

यासंदर्भात समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी ट्विट करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. "त्या व्यक्तीचे कृत्य अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्या कृत्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे," अशा आशयाचे ट्विट करत समितीने कारवाईची मागणी केली आहे.

Kedarnath
Rajiv Gandhi Death Anniversary: पीएम मोदी अन् सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली

चेअरमन अजेंद्र अजय यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे अनिष्ट कृत्ये होणार नाही याची खबरदारी घ्या आणि भविष्यात असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करा आणि त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा द्या, असे समितीने म्हटले आहे. मात्र हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असताना, अनेक लोक त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com