Corona Dainik Gomantak
देश

कोरोनाची चौथी लाट भारतात येणार का? दिल्ली टास्क फोर्सच्या सदस्याने दिले 'हे' उत्तर

दैनिक गोमन्तक

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी चौथ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीती कायम आहे. आयआयटी कानपूरने जूनच्या अखेरीस कोरोनाची (Corona) चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. चौथी लाट जूनमध्ये येणार आहे का, या प्रश्नावर दिल्ली कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि ILBS चे संचालक डॉ. एसके सरीन (Dr. SK Sareen) यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. चौथी लाट येणार नाही, पण त्यासाठी तयारी करावी लागेल. आतापर्यंत भारतातील 65 टक्के लोकांना दोन डोस मिळाले आहेत. तर एक तृतीयांश लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु मुलांचे लसीकरण पूर्णपणे झालेले नाही. अजूनही बरेच नागरिक लसीकरणापासून (Vaccination) वंचित आहेत. त्याचबरोबर बूस्टर डोस देखील घेतलेला नाही. लोक अजूनही दुर्लक्ष करत आहेत. परंतु जर तुम्ही कमकुवत असाल तर विषाणूचा धोका अधिक वाढू शकतो. परंतु भारतात असे अनेक लोक आहेत जे कमकुवत आहेत. कोरोनाचे नव नवे व्हेरिएंट येऊ शकतात.' (The fourth wave of corona will not come to India, said the director of ILBS)

डॉ सरीन यांना विविध प्रश्न आणि उत्तरे

प्रश्‍न- मास्क किती दिवस घालायचा, त्यातून कधी मुक्ती मिळणार?

उत्तर - मास्क हा एक प्रकारचा सेल्फ-लॉकडाऊन आहे. तुम्हाला स्वतःचे आणि इतरांचेही रक्षण करायचे आहे. जर तुम्हाला कोरोनापासून संरकक्षण करायचे असेल तर मास्क आवश्यक आहे. माझ्या मते 2022 पर्यंत मास्क घालावा लागेल.

प्रश्न - कार्यक्रमात कोणी मास्क घालत नाही?

उत्तर- मोठी निवडणूक रॅली, लग्न समारंभ किंवा इतर मोठ्या कार्यक्रमात लोक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. तुम्ही घेतलेली लस वुहानमधील मूळ कोरोनाच्या उत्पत्तीविरुध्द होती. डेल्टा व्हेरिएंट आल्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाला आणि आता ओमिक्रॉन व्हेरिएंट पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला आधी कोरोनाची लागण झाली असती तरीही तुम्हाला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होऊ शकते. त्याचबरोबर असेही म्हटले जातं आहे की, जर तुम्ही बूस्टर डोस घेतला असेल तुम्हाला कोरोनाची लागण होण्याची 40 टक्क्यांनी कमी होईल. परंतु तरीही 60 टक्के धोक्याची टांगती तलवार राहू शकते. म्हणूनच तिसरा डोस आवश्यक आहे.

प्रश्न- 60 वर्षांखालील नागरिकांना बूस्टर डोसची आवश्यकता आहे का?

उत्तर - हे सर्व वयोगटातील लोकांनी घेतला पाहिजे. दोन डोसनंतर अँटीबॉडी कमी होतात. बूस्टरमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पहिले दोन डोस घ्या मग बूस्टर घ्या, नाहीतर मास्क लावा. दुसऱ्या डोसनंतर 3-6 महिने बूस्टर डोस घ्या. सरकारने 9 महिन्यांचा वेळ दिला आहे.

प्रश्न- प्रत्येकाला अँटीबॉडीज असतात म्हणून चौथी लाट येत नाही?

उत्तर- हार्ड इम्युनिटी, जो पहिला व्हायरस होता त्यासाठी बर्‍याच प्रमाणात उपयोगी पडली.

प्रश्न- चौथी लाट तर येत नाही ना?

उत्तर- तुम्ही स्वतःचे संरक्षण करा, लस घ्या, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT