भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का?

कोरोनाचा नवीन प्रकार अधिक वेगाने पसरतो आहे त्यामुळे भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे.
Covid-19
Covid-19Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि त्याच्या विविध प्रकारांनी (Variant) जगभरातील लोकांना त्रस्त केले आहे. दरम्यान, चीन(China), दक्षिण कोरिया (South Korea) आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा कोविड-19 चे रुग्ण वाढू लागले आहेत. ओमिक्रॉनच्या BA2 सब-व्हेरिएंटमुळे कोरोनाची ही प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय तज्ज्ञांना चौथ्या लाटेची चिंता नाही. याचे कारण तुम्हाला माहित असलेच पाहिजे.

Covid-19
टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी एकमेव भारतीय

कोरोनाची चौथी लाट भारतात येऊ शकते का?

टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तज्ञ सुभाष साळुंखे म्हणाले की, डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान आलेल्या तिसऱ्या लाटेत भारतातील बहुतांश लोकांची प्रतिकारशक्ती खूप मजबूत झाली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला आहे.त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, आपण बेफिकीर राहून चालणार नाही. कारण जगातील अनेक देशांप्रमाणे चौथी लाट भारतातही येऊ शकते. चौथी लाट नेमकी कधी येईल आणि ती किती तीव्र असेल हे माहीत नाही.

जाणून घ्या की कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 50 हून अधिक म्यूटेशन झाले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेत Omicron चा पहिला रूग्ण आढळला होता. तेव्हा कोरोनाच्या Omicron प्रकाराबद्दल लोकांची चिंता वाढली होती. कोरोनाचा नवीन प्रकार अधिक वेगाने पसरतो आहे त्यामुळे भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे.

Covid-19
टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी एकमेव भारतीय

महाराष्ट्राची राजधानी हॉटस्पॉट

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर ओमिक्रॉनचे भारतातील हॉटस्पॉट बनले होते. येथे 7 जानेवारी रोजी एकाच दिवसात ओमिक्रॉनचे 20 हजार 971 रुग्ण आढळले होते. कोविड विरुद्ध महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी म्हणाले की, जीनोम सिक्वेन्सिंगमुळे, आम्हाला तिसर्‍या वेव्हच्या सुरूवातीला हे समजले की ओमिक्रॉनच्या BA1 आणि BA2 या दोन्ही उप-प्रकारांमुळे प्रकरणे वाढत आहेत. सध्या भारतात कोविडता धोका कमी झाला असला तरी तो पुर्णत: संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या त्रिसुत्री नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दुसर्‍या लाटेच्या परिणामाचा अंदाज घेता मास्क घालणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com