Chief Minister of Assam Himanta Biswa Sarma told the reason for India's defeat. Dainik Gomantak
देश

"त्या दिवशी इंदिरा गांधींची जयंती होती..." आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले भारताच्या पराभवाचे कारण

Himanta Biswa Sarma: यावेळी सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'पीएम म्हणजे पनौती मोदी' या टिप्पणीचा कोणताही संदर्भ घेतला नाही.

Ashutosh Masgaunde

"That day was Indira Gandhi's birth anniversary..." Now the Chief Minister of Assam Himanta Biswa Sarma told the reason for India's defeat:

टीम इंडियाचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या परीने याचे विश्लेषण करत आहे. राजकीय विश्लेषकही यामध्ये मागे नाहीत.

आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले, विश्वचषकाचा अंतिम सामना इंदिरा गांधींच्या जयंतीदिनी खेळवण्यात आला होता. त्यामुळे टीम इंडियाला पराभवास सामोरे जावे लागले.

सरमा तेलंगणा निवडणुकीदरम्यान चारमिनार येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांशी विरोधी पक्षांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, आम्ही बीसीसीआयला सांगू इच्छितो की, भविष्यात नेहरू-गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जन्म झाला त्या दिवशी अंतिम सामना होणार नाही याची काळजी घ्यावी.

सरमा म्हणाले, "त्या दिवशी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामना होता. आपण प्रत्येक सामना जिंकत होतो. फायनल हरली. मग मी पाहिले तो कोणता दिवस होता? आपण का हरलो? माझ्या लक्षात आले की, विश्वचषकाचा अंतिम सामना इंदिरा गांधींच्या जयंती दिवशी खेळला गेला होता."

मात्र, सरमा यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'पीएम म्हणजे पनौती मोदी' या टिप्पणीचा कोणताही संदर्भ घेतला नाही.

मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम म्हणजे पनौती मोदी असे म्हटल्याने राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपने राहुल यांचे वक्तव्य 'लज्जास्पद आणि अपमानास्पद' असल्याचे वर्णन केले आणि माफी मागण्याची मागणी केली.

पंतप्रधान मोदी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यामुळे भारत सामना हरला असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.

नुकताच भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात भारताला 6 फलंदाज राखत ऑस्ट्रेलियाने मात दिली. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT