Viral Video: "आपली पोरं विश्वचषक जिंकली असती, पण पनौतीनं हरवलं," राहुल गांधींचा रोख कोणाकडे?

Panauti: "आपली पोरं विश्वचषक जिंकू शकली असती, पण पनौतीने त्यांना हरवले. जनतेला ही पनौती कोण आहे हे माहीत आहे, पण टीव्हीवाले ते सांगणार नाहीत," असे म्हणत राहुल यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak

Rahul Gandhi says, Our boys were going to win the world cup but, because of a Panauti they lost:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी क्रिकेट विश्वचषकातील टीम इंडियाच्या पराभवाबाबत मोठे वक्तव्य केले.

राहुल गांधी म्हणाले, "आपल्या पोरांनी विश्वचषक जिंकला असता, पण पनौतीने त्यांना हरवले'. राहुल यांने हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

राहुल गांधी जालोरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. ते पीएम मोदींवर टीका करत होते, त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पनौती-पनौतीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

हे ऐकून राहुल गांधींनी आपले भाषण थांबवले आणि म्हणाले की, आपली पोरं विश्वचषक जिंकू शकली असती, पण पनौतीने त्यांना हरवले. जनतेला ही पनौती कोण आहे हे माहीत आहे, पण टीव्हीवाले ते सांगणार नाहीत." यानंतर राहुल यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

Rahul Gandhi
'Corona Vaccination मुळेच भारतीय तरुणांचे अचानक मृत्यू होत आहेत का? ICMRच्या अभ्यासातून नवा खुलासा

याआधी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनीही भारतीय संघाच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले आहे.

एका निवेदनात त्यांनी म्हटले होते की, पीएम मोदींनी सामना पाहायला जायला नको होते. त्यांना पाहून खेळाडू तणावग्रस्त झाले. त्यांच्यामुळेच आपला पराभव झाला. त्यांना खेळाडूंचे मनोबल वाढवायचे असते तर ते एक दिवस आधी भेटले असते.

Rahul Gandhi
एकदा दिलेली संमती व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण सुरू ठेवण्याचा परवाना देत नाही: हायकोर्ट

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवानंतर ट्विटरवर 'पनौती' हा शब्द ट्रेंड होऊ लागला आहे.

विरोधी पक्षांनी त्याचा वापर पंतप्रधान मोदींच्या विरोधात केला. असंख्य चाहत्यांसह विरोधी पक्षांचे नेते म्हणाले, भारतीय संघ अंतिम सामना हराला कारण पीएम मोदी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com