Telangana Kamareddy ATM Robbery Dainik Gomantak
देश

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Telangana Kamareddy ATM Robbery: तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातून चोरीची एक अत्यंत अचंबित करणारी घटना समोर आली, जिथे एटीएममधून रोकड लंपास करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी महिलांचे नाइट सूट परिधान केल्याचे उघडकीस आले.

Manish Jadhav

Telangana Kamareddy ATM Robbery: तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातून चोरीची एक अत्यंत अचंबित करणारी घटना समोर आली, जिथे एटीएममधून रोकड लंपास करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी महिलांचे नाइट सूट परिधान केल्याचे उघडकीस आले. ही थरारक घटना रविवारी (11 ऑक्टोबर) मध्यरात्री 1 ते 1:30 च्या दरम्यान कामारेड्डी-बांसवाडा मुख्य रस्त्यावर असलेल्या गांधारी मंडळ मुख्यालयातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये घडली. विशेष म्हणजे, हे चोरटे रुग्णवाहिकेतून आले आणि एटीएमची तोडफोड करुन रोकड घेऊन पसार झाले.

दरम्यान, चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्हीनुसार, रात्री उशिरा एक चोरटा एटीएममध्ये येतो, ज्याने महिलांची नाइटी घातलेली असते आणि चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो. तसेच, पोलिसांच्या हाती फिंगरप्रिंट्स लागू नयेत म्हणून त्याने हातात मोजे आणि डोक्यावर टोपी घातली. एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर तो पहिल्यांदा एटीएम मशीनवर एका बाटलीतून काहीसा स्प्रे फवारतो आणि बाहेर निघून जातो. त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार आत येतो, त्यानेही अगदी तसाच पेहराव केलेला असतो आणि त्याच्या हातात लोखंडाचा रॉड असतो.

हा दुसरा चोरटा रॉडच्या साहाय्याने मशीनचा खालचा भाग उघडतो, आणि त्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार आत वेल्डिंग मशीन घेऊन येतो. हे चोरटे वेल्डिंग मशीनच्या जोरावर एटीएम मशीन कापू लागतात, ज्यामुळे मशीनमधून ठिणग्या उडताना दिसतात. बऱ्याच प्रयत्नांनंतर ते वेल्डिंगच्या मदतीने मशीन कापण्यात यशस्वी होतात आणि रोकड घेऊन पसार होतात.

दुसरीकडे, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी केली जात असून संदिग्ध चोरांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मात्र, या एटीएममधून नेमकी किती रोकड लाटण्यात आली, याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. महिलांच्या वेशभूषेत आणि रुग्णवाहिकेतून आलेल्या या भुरट्या चोरांच्या अनोख्या स्टाईलची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT