Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Telangana Road Accident 6 Dead: तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला.
Telangana Road Accident 6 Dead
Telangana AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Telangana Bus Accident: तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. डोराकुंटा परिसराजवळ एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनर लॉरीला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्दैवी दुर्घटनेत 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 20 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी बस 43 प्रवाशांना घेऊन तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबाद येथून आंध्र प्रदेशातील विजयवाड्याच्या दिशेने जात होती. बुधवारी पहाटे 5:20 वाजण्याच्या सुमारास दुर्गापुरम स्टेज आणि डोराकुंटा भागाच्या हद्दीजवळ हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की बसमधील अनेक प्रवासी आतच अडकून पडले.

Telangana Road Accident 6 Dead
Dabolim Bike Rider accident: दुचाकीवर कोसळलं होर्डिंग, दुचाकीस्वार थोडक्यात वाचला; दाबोळीतील धक्कादायक घटना

अपघातात मृत्यू झालेल्या 6 व्यक्तींमध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Telangana Road Accident 6 Dead
Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील भिंडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि पिकअपच्या धडकेत 8 मजुरांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

या दुर्दैवी दुर्घटनेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतकांच्या कुटुंबांप्रती आपल्या संवेदना प्रकट केल्या. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना तात्काळ आदेश देऊन जखमींना त्वरित व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, अधिकाऱ्यांनी जखमींच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले. पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या अचूक कारणाचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरु केला.

Telangana Road Accident 6 Dead
Goa Accident: गोव्यात तीन दुर्घटनांमध्ये तिघांचा बळी! सुकूर, खांडोळ्यात भीषण अपघात; करंझाळेत कोसळलं झाड

दरम्यान, तेलंगणात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू गावाजवळ टीजीएसआरटीसी बस आणि ट्रकच्या धडकेत 25 प्रवासी जखमी झाले होते. करीमनगरहून निजामाबादकडे जाणाऱ्या 50 प्रवाशांच्या बसला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अशा भीषण अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com