Team India Test squad Dainik Gomantak
देश

Team India Test squad: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'हे' खेळाडू इंग्रजांना देणार टक्कर; कर्णधार कोण?

India vs England Test Series: भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, ज्यासाठी आज शनिवार (२४ मे) टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

Sameer Amunekar

India vs England Test Series Squad Annoucement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. युवा फलंदाज शुभमन गिलकडे कसोटी संघाचं कर्णधारपद तर उपकर्णधार ऋषभ पंतकडे सोपवण्यात आलं आहे.

भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे, कारण कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघात मोठ्या बदलांची अपेक्षा होती. याच पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने युवा सलामीपटू शुभमन गिलला या फॉरमॅटमधील नवीन कर्णधारपदी नियुक्त केलं आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपाने ६ गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्या रूपात तीन फिरकीपटू आहेत.

करुण नायरचं पुनरागमन

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरची निवड झाली आहे. नायर आठ वर्षांनी कसोटी संघात परतला आहे. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी क्रिकेट २०१७ मध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शार्दुल ठाकूरचीही निवड झाली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना - २०-२४ जून, हेडिंग्ले

  • दुसरा कसोटी सामना - २-६ जुलै, एजबॅस्टन

  • तिसरा कसोटी सामना - १०-१४ जुलै, लॉर्ड्स

  • चौथा कसोटी सामना - २३-२७ जुलै, मँचेस्टर

  • पाचवा कसोटी सामना - ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT